
अभिनेता अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज यांनी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. 25 डिसेंबर 2023 मध्ये अरबाज आणि शूरा खान यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अरबाद खान याने स्वतःच्या लव्हलाईफवर मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत अरबाज खान म्हणाला, ‘जर तुम्हाला पहिल्यांदा प्रेम होत असेल तर, दुसऱ्यांदा देखील प्रेम होऊ शकतं. कारण तुम्ही प्रेमळ आहात. प्रत्येकाला दुसऱ्यांदा प्रेम करण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यांदा प्रेम करण्यात कोणतीच हरकत नाही. तुम्ही जेव्हा एखाद्यावर प्रेम करता तेव्हा अडचन येत नाही. अडचन तेव्हा येते जेव्हा कोणी तिरस्कार करतो.’
‘कोणावर प्रेम करायला काहीही हरकत नाही. जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडले असाल तर, त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं तयार होतं. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आनंदी नसाल आणि दुसरीकडून प्रेम मिळत असेल तर, त्या प्रेमाचं मोठया मानाने स्वागत करा.’ यावेळी अरबाज असं देखील म्हणाला की, मी एक प्रायव्हेट पर्सन आहे.
अरबाज खान म्हणाला, ‘मी कधीच पैसे देऊन पापाराझींना बोलावलं नाही. माझं खासगी आयुष्या कोणाला माहिती असावं अशी माझी बिलकूल इच्छा नाही. लग्नाआधी देखील मी नातं गुपित ठेवलं होतं. पण सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य समोर आलं पाहिजे असा दबाव कायम असतो. पण मला माझ्या खासगी आयुष्यावर बोलायला मुळीच आवडत नाही…’, अरबाज कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अरबाज खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या जवळपास 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोटाची घोषणा केली.
घटस्फोटानंतर मलायका हिने 2o19 मध्ये अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अनेक वर्ष अर्जुन आणि मलायका एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ‘मी सध्या सिंगल आहे…’ असा खुलासा देखील अर्जुन याने केलेला.