मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या प्रश्नावर अरबाज खानने दिली अशी प्रतिक्रिया, VIDEO होतोय व्हायरल
मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अरबाज खानने दुसऱ्यांदा आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आता मलायकाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. मलायका आणि अर्जुन कपूर लग्न करणार का असा प्रश्न जेव्हा अरबाज खानला विचारण्यात आला तेव्हाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता अरबाज खानने पुन्हा एकदा नवी सुरुवात केली आहे. नुकताच त्याचा दुसरा विवाह पार पडला. पण जेव्हा मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांच्या चाहत्यांना हे आवडलं नव्हतं. पण आता अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आता लग्न कधी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अरबाज खानचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या अफवेवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
अरबाज २०१९ मध्ये एका ऑनलाइन शोच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. तेव्हा एका पत्रकाराने अभिनेत्याला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबत पसरलेल्या अफवांबद्दल विचारले होते. यावर अरबाज खानने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. या प्रश्नावर अरबाज आधी जोरात हसला आणि नंतर असे उत्तर दिले की तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.
अरबाज म्हणाला होता, ‘बरं, तू हा अत्यंत बुद्धिमान प्रश्न विचारला आहेस, तू रात्रभर याचा विचार केला असेल. सर, मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. पण तू विचार करायला एवढा वेळ घेतलास म्हणून मला पण थोडा वेळ दे मी उद्या सांगितले तर चालेल का?
या संवादादरम्यान अरबाज खान संपूर्ण वेळ हसत राहिला. उल्लेखनीय आहे की अरबाज खानच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाजचा मुलगा अरहान गिटारवर परफॉर्म करताना दिसत आहे. अरबाज-शुराच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आले होते. पण मलायका लग्नाला अनुपस्थित राहिली.
