AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या पार्टीत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दिसले रोमँटिक मूडमध्ये, अभिनेत्याचे ते फोटो…

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी नेहमीच चर्चेत असते. बऱ्याच वेळा त्यांच्या रिलेशनमुळे त्यांना सोशल मीडियावर खडेबोल सुनावले जातात. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर तिच्यावर टिका करण्यात आली.

बहिणीच्या पार्टीत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दिसले रोमँटिक मूडमध्ये, अभिनेत्याचे ते फोटो...
| Updated on: Nov 16, 2023 | 7:56 PM
Share

मुंबई : नुकताच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोनम कपूर हिने आयोजित केलेल्या पार्टीला पोहचले. आता या पार्टीतील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिने या पार्टीमधील अत्यंत खास असे पाच फोटो शेअर केले. मात्र, या पाचपैकी सर्वात शेवटच्या फोटोची तूफान चर्चा ही रंगताना दिसतंय. या फोटोमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. दोघांची जोडी गोड दिसत आहे. आता हीच पोस्ट व्हायरल होत आहे.

सोनम कपूर हिने तिच्या घरी डेविड बेकहम याच्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. डेविड बेकहम हा सध्या भारत दाैऱ्यावर आहे. सोमन कपूर हिने आयोजन केलेल्या या पार्टीमध्ये कपूर फॅमिली मोठ्या प्रमाणात दिसली. अर्जुन कपूर याच्यासोबत मलायका देखील या पार्टीमध्ये सहभागी झाली. मलायका अरोरा हिने डेविड बेकहम याच्यासोबतचे देखील खास फोटो शेअर केले.

एका फोटोमध्ये मलायका अरोरा ही डेविड बेकहम याच्यासोबत गप्पा मारताना देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये वेगळे लोक दिसत आहेत. ही पोस्ट मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्यासह सोनम कपूर हिला देखील शेअर केली. अर्जुन कपूर आणि मलायका हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. मुळात म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेली प्रत्येक पोस्टची वाऱ्यासारखी व्हायरल होते. चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच मलायका अरोरा ही दिसते.

मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एका गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसले. तसेच मलायकाच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्टही अर्जुन याने शेअर केली.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल