AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे दिवस परत येणार नाही….’ अर्जुन कपूर अन् मलायका अरोराची एकमेकांसाठी सोशल क्रिप्टिक पोस्ट; नेटकरीही गोंधळात

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेक झाल्यानंतर देखील त्यांच्या चर्चा होताना दिसतात. विशेषत: त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या. आताही यो दोघांची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टच्या माध्यमातून दोघेही एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटत आहे.

'हे दिवस परत येणार नाही....' अर्जुन कपूर अन् मलायका अरोराची एकमेकांसाठी सोशल क्रिप्टिक पोस्ट; नेटकरीही गोंधळात
Malaika Arora arjun kapoor...Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2025 | 1:40 PM
Share

नात्यात असताना देखील आणि ब्रेकअप झाल्यावही चर्चेत अणारं कपल म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. दोघांनीही अधिकृतपणे त्यांचे नाते संपुष्टात आल्याची घोषणाही केली आहे. पण तरी देखील चाहत्यांना या जोडीने पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा आहे. मलायकासोबत ब्रेक झालं असलं तरीदेखील अर्जुन आणि मलायका एकमेकांची काळजी घेतात आणि वाईट काळात एकमेकांना साथ देताना देखील दिसतात.तसेच सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करताना दिसतात. आता देखील हे दोघे एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोघांनीही अशी काही पोस्ट केली आहे की नेटकरी देखील गोंधळले आहेत.

अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली

अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सतत गूढ पोस्ट शेअर करत असतो. अर्जुन कपूरने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने लिहिले आहे की, ‘कधीतरी हे समजेल.’ आता तो इथे कशाबद्दल बोलत आहे? हे फक्त अर्जुनलाच माहिती आहे, पण त्यानंतर लगेच मलायकाने देखील एक पोस्ट केली ज्यामुळे असे वाटत आहे की दोघेही एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

मलायकाच्या पोस्टचा आणि अर्जुनचा काही संबंध आहे का?

मलायका अरोराने पोस्टमध्ये लिहिलं आहे की ‘तुम्हाला जे आनंद देतं ते करा, हे दिवस परत येणार नाहीत.’ आता मलायका अरोराची ही पोस्ट पाहून ती अर्जुनला काहीतरी सांगू पाहतेय असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दोघांच्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अर्जुन कपूरच्या गूढ पोस्ट वाढतच आहेत.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं ब्रेकअप का झालं? याचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही? दोघांनीही त्यांच्या लव्ह लाईफबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. तथापि, अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून उदास दिसत आहे. तो सोशल मीडियावर गूढ पोस्ट शेअर करून सतत त्याच्या भावना व्यक्त करत आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.