AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच..; वडिलांच्या आठवणीत ‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’ भावूक

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. जून महिन्यात त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिल्याचं त्याने सांगितलं आहे.

त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच..; वडिलांच्या आठवणीत 'तारक मेहता..'मधील 'बाघा' भावूक
Tanmay VekariaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2026 | 9:34 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका ही बाघाची आहे. अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही काळापासून तन्मय त्याच्या खासगी आयुष्यात अत्यंत कठीण काळाचा सामना करत आहे. जून महिन्यात तन्मयचे वडील आणि प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद वेकारिया यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला आहे.

‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या सेलिब्रेशनमध्ये तन्मय त्याच्या वडिलांना आठवत भावूक झाला होता. यावेळी त्याने वडिलांच्या शेवटच्या इच्छेविषयी खुलासा केला. तन्मयने सांगितलं की, त्याच्या वडिलांच्या निधनापूर्वी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा मालिकेत बाघा आणि बावरीची प्रेमकथा सुरू होती. कठीण काळातही त्याच्या वडिलांनी त्याला काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.

मालिकेच्या सक्सेस पार्टीमध्ये माध्यमांशी बोलताना तन्मयने त्याच्या वडिलांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण सांगितली. “ते मला म्हणाले, सेटवर माझ्या निधनाची काही बातमी आली तर, परत येण्याची घाई करू नकोस. जमेल तितकं उत्तम काम पूर्ण कर. निर्मात्यांचं कोणतंही नुकसान होता कामा नये.” वडिलांची शेवटची इच्छा सांगताना तो पुढे म्हणाला, “माझे वडील दररोज रात्री साठेआठ ते नऊच्या दरम्यान ‘तारक मेहका उल्टा चष्मा’ ही मालिका बघत बसायचे. जेव्हा ते रुग्णालयात होते आणि माझा एपिसोड प्रसारित होत होता, तेव्हा ते म्हणाले होते की, तुझी कथा खूप छान पुढे जात आहे. मी घरी आल्यावर मला युट्यूबवर सर्व एपिसोड दाखव. मला ते सर्व एपिसोड्स बघायचे आहेत. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही.”

वडिलांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच तन्मयच्या आईचंही निधन झालं होतं. काही महिन्यांच्या अंतरावरच आई आणि वडिलांना गमावल्याने तन्मयवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून तो हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा