मलायका-अर्जुनचं पॅचअप? ‘ती’ एक गोष्ट पाहून चाहते खुश!

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता. वयातील अंतरामुळे ही जोडी सतत चर्चेत असायची.

मलायका-अर्जुनचं पॅचअप? ती एक गोष्ट पाहून चाहते खुश!
Arjun Kapoor and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2025 | 10:34 AM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. परंतु जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या वृत्ताने चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. कारण ब्रेकअपपूर्वी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. दोघांकडून नातं संपुष्टात आल्यानंतर सोशल मीडियावर सतत क्रिप्टिक म्हणजेच ज्यातून ठराविक संदेश देण्याचा प्रयत्न करणारे पोस्ट लिहिले गेले. काही पोस्टमध्ये त्यांनी एकमेकांना टोमणेदेखील मारले होते. त्यामुळे हे दोघं भविष्यात पुन्हा एकत्र येणार नाही, असं चाहत्यांना वाटलं होतं. परंतु आता मलायका आणि अर्जुनमधील दुरावा कमी होताना दिसत आहे. याची सर्वांत मोठी हिंट अर्जुन कपूरने दिली आहे.

मलायकाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये तिने तिच्या रविवारच्या सुट्टीची झलक दाखवली होती. या फोटोंमध्ये मलायका तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये आराम करताना दिसून आली. त्याचसोबत तिने विविध खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. मलायकाने तिच्या या पोस्टमध्ये प्रेमाबद्दलची एक ओळसुद्धा शेअर केली होती. त्यात लिहिलं होतं, ‘मी तुझ्यावर मनापासून किंवा हृदयापासून प्रेम करत नाही. कदाचित माझ्या डोक्यातल्या गोष्टी विसरल्या गेल्या किंवा माझं हृदय धडधडणं बंद झालं तर.. म्हणून मी तुझ्यावर माझ्या आत्म्याने प्रेम करते.’

मलायकाची हीच पोस्ट अर्जुन कपूरने लाइक केली आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते खुश झाले आहेत. मलायका आणि अर्जुनचं पॅचअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. ब्रेकअपनंतरही मलायका आणि अर्जुन यांच्यात मैत्रीपूर्ण नातं पहायला मिळालं. परंतु मलायकाची प्रेमाबाबतची पोस्ट अर्जुनने लाइक केल्यामुळे चाहत्यांनी विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं, अशी या चाहत्यांची इच्छा आहे.

गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खुद्द अर्जुनने सिंगल असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचं नाव फॅशन स्टायलिस्ट राहुल विजयशी जोडलं गेलं होतं. परंतु या चर्चांवर दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. मलायका लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खानपासून विभक्त झाली. 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही सुखदु:खाच्या काळात अरबाज आणि मलायका एकमेकांसोबत दिसून येतात. मलायकाने तिच्या मुलासोबत मिळून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे.