AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभास तर जोकरच दिसत होता..; ‘कल्की 2898 एडी’वर प्रसिद्ध अभिनेत्याची टीका

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. त्यात प्रभास तर जोकरच दिसत होता, असं त्याने म्हटलंय. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1100 कोटी रुपयांची कमाई केली होती.

प्रभास तर जोकरच दिसत होता..; 'कल्की 2898 एडी'वर प्रसिद्ध अभिनेत्याची टीका
Prabhas in Kalki 2898 ADImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2024 | 9:05 AM
Share

काही दिवसांपूर्वीच ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठे कलाकार होते. याशिवाय अनेक लोकप्रिय अभिनेत्यांनी त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात तब्बल 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘महाभारत’ या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात प्रभाससोबतच अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन यांनीसुद्धा भूमिका साकारल्या होत्या. बिग बजेट चित्रपटाने दमदार कमाई करूनही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला तो अजिबात आवडला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्याने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाविषयी आणि प्रभासच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अर्शद वारसी आहे. ‘समिश भाटिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटावर टीका केली आहे. “मी कल्की हा चित्रपट पाहिला, पण मला तर तो अजिबात आवडला नाही. मला खूप त्रास होतो जेव्हा.. (वाक्य अर्धवटच म्हणतो.) पण अमितजींचं काम अप्रतिम होतं. मी त्यांना समजूच शकत नाही. त्या व्यक्तीकडे जी ताकद आहे, ती आपल्याला मिळाली ना, तर आयुष्य कमालीचं होईल. ते खरे आहेत असं वाटतच नाही.” या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. या मुलाखतीत अर्शदने प्रभासवर खूप नाराजी व्यक्त केली. त्याने यात भैरवची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

“प्रभास, मी खरंच खूप निराश झालोय. तो असा का.. तो जोकरसारखा दिसत होता. का? मला मॅड मॅक्स पहायचा आहे. मला तिथे मेल गिब्सनला पहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं यार? असं तुम्ही का करता? मला समजत नाही”, अशा शब्दांत त्याने टीका केली. यावेळी अर्शदने इतर काही चित्रपटांचं आणि कलाकारांचं कौतुक केलं. ‘श्रीकांत’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावने कमालीचा अभिनय केला, असं तो म्हणाला. “मी श्रीकांत हा चित्रपट पाहिला आणि मला तो खूप आवडला. या चित्रपटात राजकुमारने खूप चांगलं काम केलंय”, अशा शब्दांत त्याने प्रशंसा केली. अर्शदने शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचंही कौतुक केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.