हृतिक रोशनची पूर्व पत्नीसोबत सुझेन खानसोबत प्रेमसंबंध?, अर्सलान म्हणाला, ‘मी तिच्याशी प्रेमानेच बोलणार’

हृतिकसोबत काडीमोड घेतल्यानंतर सुझेन आणि अर्सलान रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय. यावर अर्सलान गोनी याने स्पष्टीकरण दिलं आहे. कुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्याशी मी प्रेमानेच बोलेन आणि तसंच मी सुझेनशी बोलत आहे, यात चूक काय, असं अर्सलान गोनीने म्हटलंय.

हृतिक रोशनची पूर्व पत्नीसोबत सुझेन खानसोबत प्रेमसंबंध?, अर्सलान म्हणाला, 'मी तिच्याशी प्रेमानेच बोलणार'
Sussanne Khan and Arslan Goni

मुंबई: अभिनेता हृतिक रोशनची (hrithik roshan) पूर्व पत्नी सुझेन खान (Sussanne Khan)आणि अर्सलान गोनी (Arslan Goni)रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सध्या होतेय. या दोघांना वारंवार एकत्र स्पॉट केलं जातं. कधी दोघं डिनर डेटवर गेल्याचं कळतं तर कधी ते फिरायला गेल्याचे फोटो समोर येतात. त्यामुळे हृतिकसोबत काडीमोड घेतल्यानंतर सुझेन आणि अर्सलान रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय. यावर अर्सलान गोनी याने स्पष्टीकरण दिलं आहे. कुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्याशी मी प्रेमानेच बोलेन आणि तसंच मी सुझेनशी बोलत आहे, यात चूक काय, असं अर्सलान गोनीने म्हटलंय.

सुझेनच्या पोस्टवरची अर्सलान गोनीची कमेंट चर्चेत

कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. या तिच्या पोस्टवर अर्सलानने तू लवकरच बरी होशील, अशी कमेंट केली. त्यानंतर पुन्हा एकदा सुझेन आणि अर्सलान यांच्या रिलेशनशीपबद्दल बोललं जाऊ लागलं

View this post on Instagram

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

अर्सलान गोनीचं स्पष्टीकरण

जर कुणी आजारी असेल तर लवकर बरी हो असंच मी म्हणेल. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करेन. तेच मी सुझेनच्या बाबतीत केलं त्यात चुकीचं काय आहे?, असं अर्सलाननं म्हटलं आहे. त्याचसोबत त्याने रिलेशनशीपबाबत आपली बाजू मांडली, ‘मी सोशल मीडियावरच्या कमेंटवर मी जास्त लक्ष देत नाही. माझ्याजवळी माणसं मला त्याबद्दल सांगत असतात. दोन माणसं, एक सुखी आयुष्य जगत आहेत.’ असं अर्सलाननं म्हटलं आहे.

अर्सलान गोनी कोण आहे?

अर्सलान गोनी टिव्ही कलाकार अली गोनीचा भाऊ आहे. त्याने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिया और जिया या चित्रपटात काम केलं आहे.

संबंधित बातम्या

Corona update: ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

महिला आयोगाच्या पत्रानंतर मांजरेकरांची माघार, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला

शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात

Published On - 6:17 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI