शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात

शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात
शिल्पा शेट्टी

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी(shilpa shetty) बॉलिवुडच्या टॉप हिरॉईन्सपैकी एक आहे. ती सध्या मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यानातून ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. शिल्पाने नुकताच एक व्हीडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हीडिओचं नेटकरी कौतुक करत आहेत. ज्यात ती आपली मुलगी समिशाला भूतदयेचे धडे देताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीने आपल्या इन्साग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात ती आपली मुलगी समिशाला प्राण्यावर प्रेम करायला शिकवताना दिसतेय. त्याच झालं असं की शिल्पाच्या घराजवळ एक कावळा जखमी अवस्थेत आढळून आला. यावेळी ती आपली मुलगी समिशाला जखमी कावळ्यासाठी प्रार्थना करायला सांगताना दिसून आली. यावेळी तिने समिशाला हा जखमी कावळा लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी ‘ओम साई राम’ म्हणायला सांगितलं. तसंच ती ‘गेट वेल सून बर्डी’, असं म्हणायला सांगताना दिसतेय. या व्हीडिओत समिशानेही हात जोडलेले दिसून येत आहेत.

काय आहे शिल्पाची इन्स्टाग्राम पोस्ट

शिल्पा शेट्टीने आपल्या इन्साग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात ती आपली मुलगी समिशाला प्राण्यावर प्रेम करायला शिकवताना दिसतेय. शिल्पाच्या घराजवळ एक कावळा जखमी अवस्थेत आढळून आला. यावेळी ती आपली मुलगी समिशाला जखमी कावळ्यासाठी प्रार्थना करताना दिसून आली. या व्हीडिओत समिशानेही हात जोडलेले दिसून येत आहेत. तिने व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. आपल्या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटलंय, ‘समिशा अजून 2 वर्षांची देखील झालेली नाही. तरी ती या कावळ्यासाठी प्रार्थना करतेय. मुलं सहृदयी असतात. ते निर्मळ मनाने प्रार्थना करतात. समिशाने मोठं झाल्यावरही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एवढीच अपेक्षा.’ सोबतच तिने या कावळ्याचा जीव वाचवल्याबद्दल पेटा संस्थेचे आभार मानलेत.

शिल्पा शेट्टी तिच्या अभिनय आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तिचा धडकन हा चित्रपट प्रचंड गाजला. शिल्पा डान्स रिअॅलिटी शोची जज देखील राहिलेली आहे.

संबंधित बातम्या

दीपिकाचा फोटो नेटकऱ्यांकडून ट्रोल, पण रणवीर म्हणतो, ‘तेरी जुल्फों में खोया रहूँ…’

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

Mouny Roy : ठिकाणही ठरलं, मुहूर्तही ठरला, मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत सात लग्नबंधनात अडकणार!

Published On - 1:41 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI