AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouny Roy : ठिकाणही ठरलं, मुहूर्तही ठरला, मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत सात लग्नबंधनात अडकणार!

लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouny Roy) लवकरच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) लग्नगाठ बांधणार आहे. 27 जानेवारीला मौनी सूरजसोबत सात फेरे घेणार असल्याच्या बातम्या आहेत.

Mouny Roy : ठिकाणही ठरलं, मुहूर्तही ठरला, मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत सात लग्नबंधनात अडकणार!
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 11:19 AM
Share

मुंबई : लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी अभिनेत्री मौनी रॉय लवक (Mouny Roy)रच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) लग्नगाठ बांधणार आहे. 27 जानेवारीला मौनी सूरजसोबत सात फेरे घेणार असल्याच्या बातम्या आहेत. हे एक बीच वेडिंग असेल, ज्यामध्ये कुटुंब आणि उद्योगातील काही खास लोक सहभागी होणार आहेत. दोघेही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंगचे प्लॅनिंग करत आहेत. मौनीच्या जवळच्या सूत्राने लग्नाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉय गोव्यात लग्न करणार

मौनीच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. काही दिवसांपासून लग्नाची आमंत्रणे पाठवली जात आहेत. तसंच लग्नाला येणार्‍या पाहुण्यांना लग्नाशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती मीडियाला देऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे. याशिवाय सर्व पाहुण्यांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले आहे.

वॅगेटोर बीचवरील डब्ल्यू गोवा रिसॉर्ट बुक केले आहे. दुपारच्या वेळेला दोघेही लग्नबंधनात अडकतील. हे लग्न समुद्रकिनाऱ्यावर असेल. कोरोनाच्या वाढत असलेल्या केसेस आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता, अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती आहे.

लग्नानंतर 28 जानेवारीला डान्स फंक्शन असेल. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि डान्स रिअॅलिटी शोचे प्रतीक उतेकर आणि राहुल शेट्टी परफॉर्म करतील. दोघेही या सगळ्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नात एकता कपूर, डिझायनर मनीष मल्होत्रा, आशिका गोराडिया यांच्यासह अनेक मौनीचे जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. याशिवाय मौनी रॉय तिची बॅचलर पार्टी गोव्यातच इन्जॉय करणार आहे.

‘नागिन’ अभिनेत्री मौनी रॉय मुंबई आणि गोवा दरम्यान सतत प्रवास करते. लग्नाला येणार्‍या कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ती स्वतः ही संपूर्ण व्यवस्था करत आहे. याशिवाय सूरज नांबियारही सध्या मुंबईत आहे. मात्र, तो अद्याप पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेला नाही. मौनी रॉयला नवरी बनताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

संबंधित बातम्या

महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात, महिला आयोगाने धाडलं आक्षेपाचं पत्र

Parineeti Chopra | बॉलिवूडची ट्रॅव्हल गर्ल परिणीती चोप्राने फ्लॉन्ट केली काळ्या रंगाची बॅग, किंमत ऐकून शॉकच लागेल!

Happy Birthday : अध्ययन सुमन चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत , काही काळ डिप्रेशनचाही शिकार!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...