प्रसिद्ध अभिनेत्रीला दुखापत, हातात घुसले काचेचे 7 तुकडे, हाताला पडले एवढे टाके घातले

Arti Singh Injured : टीव्ही अभिनेत्री आरती सिंग तिच्या नवीन व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, तिच्या नवीन व्हिडिओवरून ती रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीला दुखापत, हातात घुसले काचेचे 7 तुकडे, हाताला पडले एवढे टाके घातले
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 11:59 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम आरती सिंह (Arti Singh) गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या ट्रान्स्फॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने खूप वजन कमी (weight loss) केले आहे. ज्यानंतर तिचा आत्मविश्वास खूप वाढला, जो तिच्या इंस्टाग्राम रील्समध्ये दिसतो. आता आरती सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय आहे. पण यादरम्यान तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे.

खरंतर, आरती सध्या रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीला दुखापत झाली असून तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघात झाला होता, ज्यामध्ये तिच्या हाताला खूप दुखापत झाली होती. या संपूर्ण घटनेबद्दल सांगायचे झाले तर, 23 एप्रिल रोजी आरती तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र तिथे पोहोचल्यावर तिच्या हातून चुकून एक काचेचा ग्लास फुटला. पण तेव्हा आरतीने तिच्या दुखापतीकडे फारसे लक्ष दिले नाही.

मात्र रात्री घरी पोहोचल्यानंतर तिचा हात खूप दुखू लागला. सकाळपर्यंत वेदना बरी न झाल्याने ती डॉक्टरकडे गेली. जिथे त्याच्या हातात काचेचे 7 छोटे तुकडे अडकल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते काचेचे तुकडे काढण्यात आले आणि जखमा इतक्या खोल होत्या की त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी आरतीला 6 टाके घालण्यात आले.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समोर टीव्हीवर तिची भूमिका असलेली सीरियल बघताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आरतीने कॅप्शनद्वारे सांगितले की, हा आठवडा तिच्यासाठी सोपा नव्हता. हा तिच्या कठीण प्रसंगांपैकी एक होता. ज्यामध्ये तिच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली. काच फुटली आणि हातात घुसली, ती काढण्यासाठीच सर्जरी करण्यात आली. या व्हिडीओवर अनेक कॉमेंट्स आल्या असून आरतीचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. कमेंट्सद्वारे यूजर्स तिला गेट वेल सून म्हणत आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.