AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | रामायणमधील ‘राम’ आदिपुरुषवर भडकला, चित्रपटाच्या निर्मात्यांवर काढली भडास

आदिपुरुष हा चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. आदिपुरुष चित्रपटावर सतत मोठ्या प्रमाणात टीका ही केली जात आहे. मात्र, दुसरीकडे प्रभासच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ देखील बघायला मिळत आहे. चित्रपटाने धमाकेदार कमाई करण्यासही सुरूवात केलीये.

Adipurush | रामायणमधील 'राम' आदिपुरुषवर भडकला, चित्रपटाच्या निर्मात्यांवर काढली भडास
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 17, 2023 | 7:17 PM
Share

मुंबई : प्रभास याचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. आदिपुरुष या चित्रपटावर टीका मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात ठाकरे गट देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या दाखवल्याचा दावा हा सातत्याने केला जात आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांच्या समस्यांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. आदिपुरुष दुसरीकडे बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करताना दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटाने ओपनिंग धमाकेदार पध्दतीने नक्कीच केलीये. पठाण चित्रपटाचा (Movie) रेकाॅर्ड ब्रेकही प्रभासच्या चित्रपटाने केलाय.

आदिपुरुष चित्रपटाबद्दल आता थेट रामायणमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी मोठे भाष्य करत आदिपुरुष चित्रपटावर टीका केलीये. आदिपुरुषवर यावेळी सडकून टीका करताना देखील अरुण गोविल हे दिसले आहेत. अरुण गोविल यांनी एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये त्यांनी आदिपुरुष चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.

अरुण गोविल म्हणाले की, रामायण हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे आणि त्याच्या स्वरूपाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे अजिबातच अस्वीकार्य आहे. मुळात म्हणजे रामायणला आधुनिकता आणि पौराणिक कथांबद्दल बोलणे फार जास्त चुकीचे आहे. खरोखरच चित्रपटातील काही चिंतेच्या बाबी या नक्कीच असल्याचे देखील अरुण गोविल यांनी म्हटले आहे.

मुळात म्हणजे आदिपुरुष चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद हा निर्माण झालाय. आदिपुरुष चित्रपटावर जोरदार टीका ही सातत्याने केली जात आहे. आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आदिपुरुष चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे. ओम राऊत यांना आदिपुरुष चित्रपटाकडून मोठी अपेक्षा ही नक्कीच आहे.

आदिपुरुष चित्रपटात बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुख्य भूमिकेत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट सैफ अली खान याच्या लूकची खिल्ली उडवल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटाचे अजिबातच प्रमोशन करताना सैफ अली खान हा दिसला नाही. वाद वाढवायचा नसल्यानेच प्रमोशन टीममध्ये सैफ अली खान नसल्याचे सांगितले जात होते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी