Aryan Khan : नंबर वन व्यक्तीशी तुलना होणं… वडील शाहरुखसोबत होणाऱ्या तुलनेवर मुलगा आर्यन खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. त्याच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता टाइम मॅगझिनच्या पहिल्या TIME100 Next India यादीतही आर्यनला स्थान मिळालं आहे.

Aryan Khan : नंबर वन व्यक्तीशी तुलना होणं... वडील शाहरुखसोबत होणाऱ्या तुलनेवर मुलगा आर्यन खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
Aryan Khan on Shah Rukh Khan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 8:46 PM

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा किंग हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एसआरके हा गेल्या अनेक दशकांपासून हिंदी सिनेसृष्टीवर राज्या करत आहे. आता त्याच्या मुलांनीही इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली आहे. गेल्यावर्षी शाहरुखचा मुलगा आर्यन खान याची द बैड्स ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. ही सिरीज त्याने स्वतः दिग्शदर्शित केली होती. प्रेक्षकांनाही ती प्रचंड आवडली. पहिला प्रयत्न म्हणून अनेकांनी आर्यनचं प्रचंड कौतुक केलं.

त्याचवेळी शाहरुखची मुलगी सुहाना खान हिनेही तिची बॉलिवूडमधील ग्रँड एन्ट्री केली आहे. 2023 साली प्रदर्शित झालेल्या द आर्चीज या नेटफ्लिक्सच्या सिनेमातून ती प्रेक्षकांसमोर आली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं होतं.

Loading...

दरम्यान, आर्यन खान आता TIME100 Next India या मॅगझिनमध्ये झळकला आहे. टाइम मॅगझिनच्या पहिल्या TIME100 Next India यादीत त्याचा समावेश झाला आहे. विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. ज्यात आर्यनचंही नाव आहे. ज्याचा शाहरुखलाही प्रचंड आनंद वाटत असेल.

आर्यनला यावरुन वडिलांशी होणाऱ्या तुलनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही तुलना कौतुकासारखी घेत असल्याचे सांगितले.

नेमकं काय म्हणाला आर्यन?

‘प्रत्येकाची त्यांच्याशी तुलना केली गेली आहे. मीही त्यापैकी एक असेन, तर त्यात काहीच गैर नाही. देशातील नंबर वन व्यक्तीशी तुलना होणे ही माझ्यासाठी कौतुकाची बाब आहे. ते खरोखरच कमाल व्यक्ती आहेत’, असे आर्यन म्हणाला.

आर्यनने अद्याप आपल्या पुढील दिग्दर्शकीय प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. तर शाहरुख खान सध्या ‘किंग’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सुहाना खान, दीपिका पदुकोण, जयदीप अहलावत, अभिषेक बच्चन आणि अभय वर्मा महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us