
अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा रोमँटिक सिनेमा ‘सैयारा’ रिलीज झाल्यापासून तुफान कमाई करत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विशेषतः चित्रपट पाहाताना लोक बेशुद्ध होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पाहायला मिळते. हे सगळं पाहून आता एका मुलीचा राग अनावर झाला आहे आणि तिने चित्रपटाच्या चाहत्यांना चांगलंच खडसावलं आहे.
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या ‘सैयारा’ या रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा धुरळा उडवला आहे. सोशल मीडियावर तर लोक रडत असल्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच दरम्यान, एका मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती रडणाऱ्या लोकांना जोरदार फटकारत आहे.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, मनोरंजन विश्वातून खळबळ
2025 ची सुपरहिट फिल्म ‘सैयारा’
‘सैयारा’ या चित्रपटाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातील अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने तरुणांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटातील संवाद, गाणी आणि भावनिक दृश्यांवरून वेडे होत आहेत. पण याचवेळी एका मुलीने या ‘ओवर-डोज ऑफ रोमांस’ वातावरणाविरोधात आवाज उठवून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
ती मुलगी व्हिडीओमध्ये म्हणते, “जिकडे बघावं तिकडे फक्त हेच दिसतंय – पब्लिक रिअॅक्शन, लोक बेशुद्ध होताहेत. अरे भाऊ, किंडरगार्डनवाल्यांना पब्लिक म्हणू नका. ज्या वयात आईकडून थोबाडीत पडायला हवी, त्या वयात यांचं हृदय तुटतंय. आधी मला हे सांगा, हे हृदय तुटतंय तरी कसं? आजची पिढी इतकी अतिव्यक्त होतेय कशी? आम्ही तर थिएटर सोडा, घरातही अशा रोमँटिक फिल्म्स पाहू शकत नव्हतो. ही कसली पिढी आहे, जी एका चित्रपटाने डिप्रेशनमध्ये गेली? काय यार, तुम्ही कसले देशाचे आदर्श तरुण बनणार!”
“हा फक्त चित्रपट आहे, आयुष्य नाही”
नुकतंच दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात ती म्हणते, “लोक ‘सैयारा’ पाहून असे वागताहेत, जसं त्यांच्यासोबतही असे प्रेमप्रकरण घडलंय. भाई, तो फक्त चित्रपट आहे! रील लाइफ आणि रिअल लाइफमधला फरक समजा.” हा व्हिडीओ व्हायरल झाला असून काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली, तर काहींनी तिला ‘हृदय तोडणारी’ आणि ‘भावनाशून्य’ अशी उपाधी दिली.
चित्रपटाची तुफान कमाई
दरम्यान, ‘सैयारा’ तुफान कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, बुधवारी सकाळपर्यंत चित्रपटाने जवळपास 133 कोटींची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, ‘सैयारा’ खरोखरच लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे.