AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या अंत्यविधीच्या व्हिडीओतील ‘त्या’ तरुणाचीच जोरदार चर्चा; हुबेहूब सुशांतच…

आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल आणि जनाई भोसले यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आशा भोसले यांच्या अंत्यविधीच्या व्हिडीओतील 'त्या' तरुणाचीच जोरदार चर्चा; हुबेहूब सुशांतच...
Vicky Kaushal and Zanai BhosleImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 12:38 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. 12 एप्रिल रोजी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर सोमवारी 13 एप्रिल रोजी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांच्या कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथे पोहोचले होते. रणवीर सिंहपासून विकी कौशलपर्यंत, आमिर खानपासून ए. आर. रेहमानपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना अंतिम निरोप दिला. आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ अभिनेता विकी कौशल आणि आशा भोसले यांची नात जनाई भोसलेचा आहे.

हा व्हिडीओ विकी कौशल आणि जनाई यांच्यामुळे नाही तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीमुळे चर्चेत आला आहे. या व्यक्तीची सोशल मीडियावर इतकी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे, त्याचं दिसणं. ही व्यक्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारखी दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी द्यायला सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जनाई आणि विकी कौशल हे एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा त्यांच्या ठीक मागे पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेली एक व्यक्ती उभी आहे. या तरुणाचा चेहरा सुशांतशी मिळताजुळता असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ

‘हा तर हुबेहूब सुशांतसारखाच दिसतोय, चेहऱ्याचे फिचर्स किती मिळतेजुळते आहेत’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘विकी कौशलवर तर नजरच गेली नाही, थेट मागे उभ्या असलेल्या तरुणाकडे लक्ष गेलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा तरुण आहे तरी कोण? तो आशाजींच्या कुटुंबातला आहे का’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी आशाताईंबरोबर अनेक परदेश दौऱ्यात त्यांची साथसंगत करणारे प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि शान यांनी गाण्यातून त्यांना स्वरांजली वाहिली.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान