AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावूक; आजीसाठी लिहिली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसलेनं सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये तिला आजी आशा भोसले यांच्यासोबत अनेकदा पाहिलं गेलंय.

आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावूक; आजीसाठी लिहिली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
Asha Bhosle and Zanai BhosleImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 1:27 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल 2026 रोजी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांच्या निधनाने सबंध मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसले पूर्णपणे खचली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर अंत्यविधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये जनाई रडताना, जड अंत:करणाने आजीला अंतिम निरोप देताना दिसली. जनाईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. आजी आशा भोसले यांच्यासोबतचा खास फोटोसुद्धा तिने शेअर केला आहे.

जनाईची पोस्ट-

‘मी अत्यंत भावनाविवश झाले आहे. मला शक्य असेल तेव्हा मी काहीतरी लिहीन, पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, माझ्या आजीचा आदर करणारे असंख्य लोक आहेत. तिच्या अंत्यविधीला येऊन त्यांनी तिला तो सन्मान दिला आणि तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझी आजी या आदरास आणि प्रेमास पात्र होती. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिने हे सर्व पाहिलं असेल’, अशा शब्दांत जनाईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दुसऱ्या पोस्टमध्ये जनाईने तिच्या आजीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघीही कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहेत. ‘गुडबाय माय लव्ह, माझ्या आयुष्यातील प्रेम’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. आशा भोसले आणि जनाई यांच्यातील नातं खूपच खास होतं. जनाई तिच्या आजीच्या खूप जवळ होती. सोशल मीडियावर ती सतत त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करायची. सोमवारी जनाईने साश्रू नयनांनी तिच्या आयुष्यातील सर्वांत खास व्यक्तीला, तिच्या आजीला अंतिम निरोप दिला.

आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी आशाताईंबरोबर अनेक परदेश दौऱ्यात त्यांची साथसंगत करणारे प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि शान यांनी गाण्यातून त्यांना स्वरांजली वाहिली.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?