दोघं एकत्र वॉशरुमला गेले अन्..; हाऊस पार्टीदरम्यान काय काय घडलं? ‘ये रिश्ता..’ फेम अभिनेता अटकेत
'ये रिश्ता क्या कहलाता है', 'सरस्वतीचंद्र', 'ससुराल सिमर का', 'सात फेरे' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आशिष कपूरला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. एका महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आशिष कपूरला बुधवारी पुण्यातून अटक करण्यात आली. त्याच्यावर एका महिलेनं बलात्कार आणि मारहाण यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आशिषचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा डिअॅक्टिव्हेट झालं असून पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत. पीडित महिला आणि आशिषची ओळख इन्स्टाग्रामवरूनच झाली होती. त्यानंतर त्याने तिला दिल्लीतील एका मित्राच्या घरी पार्टीला बोलावलं होतं. तिथेच वॉशरुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली असून ‘हाऊस पार्टी’दरम्यान काय घडलं, याविषयीचा खुलासा केला. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. त्यातून महत्त्वपूर्ण अपडेट्स समोर आले आहेत.
हाऊस पार्टीदरम्यान काय काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती पीडित महिलेनं दिली. त्यावरून आशिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अखेर दिल्ली पोलिसांकडून त्याला अटक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि पीडित महिलेची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली होती. त्यानंतर त्याने तिला हाऊस पार्टीसाठी आमंत्रित केलं. आशिषच्या मित्राच्या घरी ही पार्टी होती. तिथे त्याच्यासोबत त्याचा मित्र आणि त्याची पत्नीसुद्धा होती. आशिषने ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळल्याचाही आरोप पीडितेनं केला आहे. इतकंच नव्हे तर याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर व्हिडीओ लीक करण्याचीही धमकी आशिषने दिल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजसुद्धा आढळले आहेत. या फुटेजमध्ये आशिष त्या महिलेसोबत वॉशरुममध्ये जाताना दिसत आहे. काही वेळानंतर त्याचा मित्र आणि इतर पाहुणे वॉशरुमचा दरवाजा ठोठावतात. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 40 वर्षीय आशिष कपूरने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय यात ‘श्श्श… फिर कोई है’, ‘ससुराल सिमर का 2’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सात फेरे.. सलोनी का सफर’, ‘सरस्वतीचंद्र’ आणि ‘मोलकी- रिश्तों की अग्निपरीक्षा’ यांचा समावेश आहे. ‘देखा एक ख्वाब’मध्ये उदयची भूमिका साकारून त्याला लोकप्रियता मिळाली.
आशिष याआधीही त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. ‘देखा एक ख्वाब’ या मालिकेतील सहअभिनेत्री प्रियल गोरसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु मालिका संपताच त्यांचं नातंही संपुष्टात आलं होतं. त्यानंतर आशिषने निर्माती पर्ल ग्रे हिला डेट केलं आणि एप्रिल 2021 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर त्यांनी ब्रेकअप केला. आशिषचं नाव इदा क्रोनी या युरोपियन महिलेशीही जोडलं गेलं होतं.
