AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Attack on Kailash Kher : Live कॉन्सर्टमध्ये कैलाश खेर यांच्यावर हल्ला

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, हल्ल्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ... बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकावर कोणी केला हल्ला, आता कशी आहे गायकाची प्रकृती?

Attack on Kailash Kher : Live कॉन्सर्टमध्ये कैलाश खेर यांच्यावर हल्ला
Attack on Kailash Kher : Live कॉन्सर्टमध्ये कैलाश खेर यांच्यावर हल्ला
| Updated on: Jan 30, 2023 | 11:23 AM
Share

Attack on Kailash Kher : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला पाण्याची बाटली फेकून मारली. ज्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली आहे. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकमध्ये घडलेल्या प्रकरणामुळे कैलाश खेर यांचे चाहते संतापले आहेत.

रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर कैलाश खेर यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवारी होणाऱ्या कॉन्सर्टची माहिती कैलाश खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, तीन दिवस चालणाऱ्या हम्पी उत्सवाची सुरुवात २७ जानेवारी रोजी झाली आहे. नवीन विजयनगर जिल्हा तयार झाल्यानंतर पहिल्यांदा याठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.

कैलाश खेर यांना सोमवारी एक ट्विट केलं. ज्यामध्ये ते कन्नड भाषेमध्ये परफॉर्मेंस देताना दिसत आहेत. व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले, ‘जेव्हा पुनीत राजकुमार यांना कैलासा संगीतमय श्रद्धंजली वाहिली आणि त्यांच्यावर चित्रित केलेल्या आमच्या कन्नड गाण्यांची मालिका सादर केली. तेव्हा संपूर्ण विजयनगर त्यांच्यासोबत गात होता..’ कैलास लाइव कॉन्सर्टचा हम्पी उत्सव 2023 भावनिक असल्याचं देखील कैलाश खेर म्हणाले.

कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि कन्नड सिनेसृष्टीतील कलाकारांनी परफॉर्म केलं. कार्यक्रमात कन्नज गायक अर्जुन, जान्या, विजय प्रकाश, रघू दीक्षित आणि अनन्या भट्ट यांनी त्यांची कला सादर करत एक माहोल तयार केला. तर बॉलिवूडमधील अरमान मलिक आणि कैलाश खेर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच