AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं..; कॉक्रोच जनता पार्टीवरून अतुल कुलकर्णींचा सरकारला टोला

अभिनेते अतुल कुलकर्णी हे विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर बेधडकपणे आपली मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. कॉक्रोच जनता पार्टीवरून त्यांनी सरकारला थेट टोला लगावला आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते सविस्तर वाचा..

शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं..; कॉक्रोच जनता पार्टीवरून अतुल कुलकर्णींचा सरकारला टोला
अतुल कुलकर्णीImage Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2026 | 3:14 PM
Share

देशातील काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत. ते सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये शिरकाव करतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि सर्वांवर हल्ले करू लागतात, असं वक्तव्य देशाच्या सरन्यायाधीशांनी केलं. त्यांच्या या वक्तवाला प्रतिसाद म्हणून पूर्वी ‘आप’मध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थित असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर प्रश्न केला की, ‘ही सारी झुरळं एकत्र आली तर?’ मग काही झुरळांनी एकत्र येऊन सोशल मीडियावर पक्ष तयार केला आणि त्याला नाव दिलं ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी). या पक्षाने अवघ्या काही दिवसांत देशातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या पार केली. या संपूर्ण घटनेवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर अत्यंत मार्मिक पोस्ट लिहिली आहे.

अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये थर्मोमीटरचं उदाहरण दिलं. कॉक्रोच जनता पार्टीने कशाप्रकारे एका थर्मोमीटरचं काम केलंय, हे त्यांनी पटवून दिलंय. इतकंच नव्हे तर जर थर्मोमीटर चुकतंय असं वाटत असेल, तर सेकंड, थर्ड ओपनियन घेणं हे सगळ्यात शहाणपणाचं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

अतुल कुलकर्णींची पोस्ट-

‘अंगाला हात लावून ताप आहे असं वाटत असतं, पण थर्मोमीटर लावलं की शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं. CJP (कॉक्रोच जनता पार्टी) नं थर्मोमीटरचं काम केलंय. थर्मोमीटरलाच डॉक्टर आणि इलाज समजणं हे ना थर्मोमीटरने स्वतः मानणं योग्य, ना थर्मोमीटरकडून तशा अपेक्षा ठेवणाऱ्यांनी. थर्मोमीटर चुकीचंच तापमान दाखवतंय असं म्हणणं वेगळं, ते अशा कंपनीनं बनवलंय ज्यांना आमचं बरं बघवत नाही असं म्हणणं वेगळं आणि ते आम्हाला हवंय ते तापमान दाखवत नाही आहे तेव्हा फोडूनच टाका म्हणणं वेगळं. थर्मोमीटर चुकतंय असं वाटत असेल तर सेकंड, थर्ड ओपिनियन घेणं हे सगळ्यात शहाणपणाचं. ताप नसेल तर उत्तमच की, असो,’ अशी पोस्ट अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे.

आपल्या समाजात गेल्या काही वर्षांपासून असंतोष दडपला गेला होता. कॉक्रोच जनता पार्टी ही त्या असंतोषाचीच अभिव्यक्ती असल्याचं अतुल कुलकर्णी यांनी थर्मोमीटरच्या उदाहरणातून पटवून दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला