आता चिनी प्रेक्षक अनुभवणार ‘अंधाधून’चा थरार

मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानासाठी 2018 हे वर्ष खुप चांगलं गेलं. गेल्या वर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. 32 कोटींमध्ये बनलेला ‘अंधाधून’ 74 कोटी 59 लाख रुपयांची कमाई करण्यात यशस्वी ठरला. गेल्या वर्षी तिन्ही खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. मात्र आयुषमानचा लो …

आता चिनी प्रेक्षक अनुभवणार ‘अंधाधून’चा थरार

मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानासाठी 2018 हे वर्ष खुप चांगलं गेलं. गेल्या वर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. 32 कोटींमध्ये बनलेला ‘अंधाधून’ 74 कोटी 59 लाख रुपयांची कमाई करण्यात यशस्वी ठरला. गेल्या वर्षी तिन्ही खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. मात्र आयुषमानचा लो बजेट ‘अंधाधून’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि आता हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती व्हायाकॉम 18 ने ट्विटरवर दिली. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा व्हायाकॉम 18 स्टुडिओचा आणि आयुषमानचा पहिलाच सिनेमा आहे. ‘पियानो प्लेअर’ या नावाने ‘अंधाधून’ हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.


श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘अंधाधून’ हा सिनेमा प्रक्षेकांनी डोक्यावर घेतला. या सिनेमाचे कथानक आणि त्यातील सस्पेंस प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले. हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होत असल्याने दिग्दर्शक राघवन हे अत्यंत उत्सुक आहेत. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा राघवन यांचाही पहिलाच सिनेमा आहे.

“‘अंधाधून’ चीनमध्ये प्रदर्शित होतो आहे, यासाठी मी खूप उत्सुक आहे. 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी चीनला गेलो होतो, तेव्हा बीजिंगच्या कॅफेमध्ये नासिर हुसैन यांचा सिनेमा बघून मला आश्चर्य वाटलं होतं”, असे राघवन म्हणाले. या सिनेमातील गाणी सोडून संपूर्ण सिनेमा चिनी भाषेत डब करण्यात आला आहे. हा सिनेमा त्यांच्या पिढीतील सर्वात आवडत्या भारतीय सिनेमांपैकी एक आहे, असेही राघवन यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरापासून चीनमध्ये भारतीय सिनेमांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसून येत आहे. आमिर खानचा मोठा चाहता वर्ग चीनमध्ये आहे. आमिरचे चित्रपट भारतापेक्षाही चीनमध्ये सर्वाधिक कमाई करतात. मात्र, आता चीनमध्ये इतर भारतीय सिनेमांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’, ‘हिचकी’, ‘हिंदी मीडियम’ यांसारखे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *