AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी

भारतीय चित्रपटसृष्टीला  जन्माला घालणाऱ्या दादासाहेब फाळकेंना तुम्ही कसे विसरू शकता.  असा संतप्त सवाल विचारत  दादासाहेब फाळकेंना 'भारतरत्न' द्या अशू मागणी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात मराठी माणसांचा विचार केला जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी
| Updated on: Jan 04, 2025 | 1:28 PM
Share

दादासाहेब फाळके यांचा ‘भारतरत्न’साठी विचार का केला नाही?

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. बॉलिवूडमधल्या सर्व व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो मग दादासाहेब फाळके यांचा का नाही? असा सवाल विचारत बाबासाहेब यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

1954 ते 2024 पर्यंत देशात 50 जणांना ‘भारतरत्न’ देण्यात आलं आहे. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील 7 जणांना गौरवण्यात आलं आहे. यात मराठी असलेल्या फक्त “लता मंगेशकर” यांचा समावेश आहे. त्यानतंर प्रभा अत्रे, भीमसेन जोशींना पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कारही लाभलेले आहेत. बाकी सर्व पुरस्कार महाराष्ट्रात राहणार्‍या परंतु मराठी नसलेल्या 216 जणांना पद्म पुरस्कार दिले गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या नावावर 269 संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ 52चं कशा आहेत? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे.

“महाराष्ट्रात असल्याची खंत वाटते”

तसेच बाबासाहेब पुढे म्हणाले की, ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या कामाबाबत शंका नाही पण, मराठी लोकांचाही विचार या पुरस्कारासाठी करावा असं स्पष्ट मत बाबासाहेबांनी व्यक्त केलं आहे. “भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून महाराष्ट्रात असल्याची खंत वाटते.” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते”

तसेच त्यांनी बॉलीवूडमधील कलाकार आणि मराठी माणसांमध्ये नेहमी फरत का केला जातो? या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित करत खंत व्यक्त केली आहे. “बॉलीवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे” असं म्हणत त्यांन खेद व्यक्त केला.

महाराष्ट्र सोडून  इतर राज्य त्यांच्या भाषिक लोकांचा जास्त विचार करतात

पुढे ते म्हणाले की, “तामिळनाडूत तब्बल 147 पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील 43 जणांना, आंध्र व तेलंगणाच्या 59 जणांना, केरळच्या 51 जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते.

पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे 70, 51 पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांचा एकूण सांस्कृतिक पर्यावरणावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष यातून दिसून येते” असं म्हणत त्यांनी या राज्यांनी त्यांच्या भाषिक लोकांचा विचार सर्वात आधी करून त्यांच्या सन्मान कशा पद्धतीने राखला याबद्दत मत व्यक्त केलं.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.