Bahubali फेम अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नेंट! विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध आणि…
Bahubali | लग्नाआधी प्रग्नेंट राहिल्यानंतर 'बाहुबली' फेम अभिनेत्रीने प्रियकराकडून अबॉर्शनसाठी मागितले इतके पैसै...! विवाहित पुरुषावर प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात

मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | ‘बाहुबली’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने अनेक रेकॉर्ड रचले आणि अनेक रेकॉर्ड मोडले देखील. सिनेमाने दोन भागांमध्ये चाहत्यांच्या भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमातील कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना दंग केलं. ‘बाहुबली’ सिनेमामुळे अनेक सेलिब्रिटी प्रसिद्धी झोतात आले. ज्यामुळे त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या. आता ‘बाहुबली’ सिनेमात बाहुबलीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. राम्या हिचा आज वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे.
‘बाहुबली’ फेम राम्या कृष्णन (Ramya Krishnan) गेल्या तीन दशकांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. आतापर्यंत राम्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘बाहुबली’ सिनेमामुळे राम्या हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. पण सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारण्याआधी राम्या तिच्या खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
राम्या हिने दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक के एस रविकुमार यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्याचं मनोरंजन केलं. रविकुमार यांच्यासोबत काम करत दोघांमध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण के एस रविकुमार विवाहित असल्यामुळे दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं.
रिपोर्टनुसार, विवाहित के एस रविकुमार यांच्या प्रेमात राम्या पूर्ण बुडाली होती. अभिनेत्री लग्नाआधी प्रग्नेंट राहील्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण तेव्हा राम्या आणि के एस रविकुमार यांना स्वतःचं मुल नको होत म्हणून अभिनेत्रीने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी राम्याने हिने दिग्दर्शकाकडून ७५ हजार रुपये मागितल्याच्या देखील चर्चा रंगल्या…
राम्या आणि के एस रविकुमार यांच्या नात्याची आणि अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगल्यानंतर दोघांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री फक्त आणि फक्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. पण आता अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आहे.
खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्यानंतर राम्या हिने १२ जून २००३ साली निर्माते कृष्णा वामसी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रित्विक कृष्णा असं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे.
