Dharmendra : बाबांनी उचलून थेट फेकून दिलं…धर्मेंद्र लेक ईशासोबत असं का वागले ?

अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या प्रकृतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. या सर्व चर्चांदरम्यानच धर्मेंद्र यांचे काही जुने व्हिडीओज आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Dharmendra : बाबांनी उचलून थेट फेकून दिलं...धर्मेंद्र लेक ईशासोबत असं का वागले ?
ईशा देओल आणि धर्मेंद्र
Image Credit source: social media
| Updated on: Nov 22, 2025 | 10:51 AM

Dharmendra and Esha Deol : बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या प्रकृतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. आता त्यांच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असून आधीपेक्षा खूप बरी आहे. त्यांच्या निवासस्थानी मेडिकल सुपरव्हिजन असून तिथेच त्यांची रिकव्हरी होत आहे.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा

धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आता हळूहळू बरे होत आहेत. लवकरच त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारेल. आनंदाची गोष्टी म्हणजे याच दरम्यान त्यांच्या कुटुंबाने धर्मेंद्र 90 वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचेही वृत्त समोर आले आहे. यामुळे धर्मेंद्र यांचे चाहतेही खूप खुश आहेत.

धर्मेंद्र यांची लेकीशी धक्कादायक वागणूक

या सर्व चर्चांदरम्यानच धर्मेंद्र यांचे काही जुने व्हिडीओज आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्यांचे अनेक जुने किस्सेही चर्चेत आले आहे. याचदरम्यान धर्मेंद्र आणि त्यांची लेक, अभिनेत्री ईशा देओलचा एका जुन्या किश्श्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खुद्द इशानेच तो एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं.

माझ्या बाबांनी मला उचलून फेकून दिलं..

ईशा देओलने याआधी अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितलं होतं की धर्मेंद्र यांच्याशी असलेले तिचं नाते नेहमीच थोडं वेगळं आणि स्ट्रिक्ट होतं. ती एकदा म्हणाली होती की, धर्मेंद्र आपल्या मुलींशी जितकं कठोर वागतात, तितकंच ते त्यांच्यावर प्रेमही करतात. धर्मेंद्र हे खूप स्ट्रिक्ट पॅरेंट असल्याचेही तिने याआधी नमूद केलं आहे.

एका जुन्या मुलाखतीमध्ये ईशाने लहानपणीचा किस्सा सांगितला होता. मी जेव्हा 11 वर्षांची होते, तेव्हा माझ्या वडिलांनी मला एका ट्यूबवेलमध्ये फेकलं होतं, असं तिने सांगितलं. ते ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला.

11 वर्षांची झालीस तरी पोहता येत नाही ?

त्या अनुभवाबद्दल ईशा म्हणाली की, एकदा संपूर्ण कुटुंब खंडाळा येथील त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते, जिथे एक मोठा ट्यूबवेल देखील होता. धर्मेंद्र यांनी तेव्हा तिला विचारलं की, पोहता येतं का ? तेव्हा ईशाने नाही असं उत्तर दिलं, ते ऐकून धर्मेंद्र आश्चर्यचकित झाले. मी तेव्हा बाबांना सांगितलं की मला पोहता येत नाही, असं ईशा म्हणाली. मग काय बाबांनी मला उचललं आणि थेट ट्यूबवेलमध्ये फेकून दिलं. “ट्यूबवेलमध्ये पडल्यानंतर मी घाबरले आणि ओरडू लागले. भीतीने मी थरथर कापू लागले, पण त्याच प्रयत्नात मी पोहायलाही शिकले. मी ‘बाबा! बाबा!’ असे ओरडत राहिले पण मी पोहण्यात यशस्वी झाले, अशाचकारे मी पोहायला शिकलो.” असा किस्सा ईशाने हसत हसत सांगितला

धर्मेंद्र यांच्या पद्धती कदाचित कडक असतील, पण तरी ईशा देओलने हे वारंवार सांगितले आहे की ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. धर्मेंद्र नेहमीच असे मानत असत की पद्धती थोड्या कडक असल्या तरी मुलांना वाढवण्यात शिस्त महत्त्वाची असते, असं तिने नमूद केलं. ईशा देओल ही शेवटची “तुमको मेरी कसम” चित्रपटात दिसली होती, तो 21 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.