सोनालीच्या ‘शुद्ध मराठी’ Tweetआधी लेखक अरविंद जगताप महत्त्वाचं बोललेत! नेमकं ते काय होतं?

मराठी भाषा, भाषेचा लहेजा, मराठीचं व्याकरण या सगळ्याच गोष्टी अनेकदा चर्चेत येत असतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee Kulkarni) केलेल्या ट्विटकडे जर चाहत्यांची नजर गेली नसती, तर नवलच.

सोनालीच्या 'शुद्ध मराठी' Tweetआधी लेखक अरविंद जगताप महत्त्वाचं बोललेत! नेमकं ते काय होतं?
Arvind Jagtap and Sonalee KulkarniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 3:38 PM

मराठी भाषा, भाषेचा लहेजा, मराठीचं व्याकरण या सगळ्याच गोष्टी अनेकदा चर्चेत येत असतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee Kulkarni) केलेल्या ट्विटकडे जर चाहत्यांची नजर गेली नसती, तर नवलच. शुद्ध आणि स्पष्ट उच्चारांच्या मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या सोनालीची पोस्ट एका बाजूला आणि प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांची मराठी भाषा दिनी केलेली फेसबुक पोस्ट दुसऱ्या बाजूला. या दोन्ही पोस्टचा एकमेकांशी तसा थेट काही संबंध नसला, तरीही वाचकांनी या दोन्ही पोस्ट बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. कारण यामागचं मूळ कारण आणि समान धारा आहे, ती आपल्या सगळ्यांना एकमेकांशी जोडणारी मराठी भाषा (Marathi Bhasha Din). एकीकडे सोनालीने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावले आहेत. तर दुसरीकडे अरविंद जगताप यांनी मराठी बोलीभाषा जपण्याचं आवाहन केलं आहे.

अरविंद जगताप यांची पोस्ट:

‘व्याकरणातल्या चुका काढताना आकलनातल्या चुका राहून गेल्या. विचारांपेक्षा उच्चारांच्या शुद्धतेकडे जास्त लक्ष दिलं गेलं. बोलणाऱ्याची चूक सुधारण्याऐवजी त्याचा अपमान करण्यात धन्यता मानली गेली. त्या भाषा नष्ट होत गेल्या. जेवढ्या विविध बोली, तेवढी भाषा थोर. सगळ्या मराठी बोलीभाषा जपूया,’ अशी पोस्ट जगताप यांनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत सहमत असल्याचं सांगितलं. ‘उच्चार सुधारण्यामागे लागून आपण मूळ भाषा शैली गमावत आहोत’, असं एकाने म्हटलं. तर ‘भाषा शैली, लहेजा, ग्रामीण ठेका कायम ठेवायला हवा, त्याला हसण्यासारखं काहीच नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट- 

सोनाली कुलकर्णी आणि अरविंद जगताप यांच्या पोस्ट पूर्णपणे वेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील समान बाब म्हणजे मराठी भाषा आहे. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा टिकवली पाहिजे, असं मत लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्या पोस्टद्वारे नोंदवलं आहे. म्हणूनच नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या: लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांचा जंगी वाढदिवस, 75 देशी वृक्षांची बीजतुला, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदेंची उपस्थिती

संबंधित बातम्या: व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं; ट्रोल होताच उचललं ‘हे’ पाऊल

संबंधित बातम्या: ‘फँड्री’मधील ‘शालू’चा वजनदार लूक; फोटो पाहून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क!

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.