AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं; ट्रोल होताच उचललं ‘हे’ पाऊल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केलं. मात्र या ट्विटमध्ये तिने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावले आहेत. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका होत आहे.

व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीला नेटकऱ्यांनी झापलं; ट्रोल होताच उचललं 'हे' पाऊल
Sonalee KulkarniImage Credit source: Instagram/ Sonalee Kulkarni
| Updated on: Feb 28, 2022 | 2:58 PM
Share

कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिवस’ (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. या दिनानिमित्त सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी शुभेच्छांचा संदेश लिहिला. मराठी कलाविश्वातील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिनेसुद्धा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलं. मात्र या ट्विटमध्ये तिने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावले आहेत. ‘मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या’, असं उपरोधिक ट्विट तिने केलं आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे इतरांच्या व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीच्या या ट्विटमध्येच चूक असल्याचंही नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. (Marathi Actress)

काय आहे सोनालीचं ट्विट? न आणि ण श आणि ष, ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील च, जहाजामधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणार्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्च्या!!!

या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अखेर सोनालीने ते ट्विट डिलिट केलं. मात्र तिच्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावरून अजूनही तिच्यावर टीका केली जात आहे. सोनालीने विनाकारण अशी खिल्ली उडवू नये, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं. तर इतरांच्या व्याकरणाच्या चुका काढताना सोनालीने स्वत:च्याच ट्विटमध्ये ‘कळणार्यांना’ असा चुकीचा शब्द लिहिला असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या: ‘तमाशा लाईव्ह’च्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा, सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी झळकणार मुख्य भूमिकेत

संबंधित बातम्या: हिंदी-मराठीच नाही तर इटालियन चित्रपटातही झळकलीये सोनाली कुलकर्णी, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल…

संबंधित बातम्या: गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट!

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...