“भाबीजी घर पर है” चे लेखक गंभीर आजाराने ग्रस्त, कविता कौशिक म्हणाली – दुआ करा…
एफआयआर स्टार, अभिनेत्री कविता कौशिकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि भाभी जी घर पर हैं लेखकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांच्यासाठी दुआ करा अशी विनंतीही तिने केली.

‘भाबीजी घर पर हैं’ आणि ‘हप्पू की उलटन पलटन’ यांसारख्या फेमस शो चे लेखक मनोज संतोषी यांनी त्यांच्या लेखणीने अनेकांना हसवलं आहे. त्यांचे हे शो बरेच गाजले. पण सध्या हेच मनोज गंभीर आजारी आहेत. त्यांना लिव्हरचा गंभीर आजार झाला असून सध्या ते रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त समोर आलं आहे. सोमवारी एफआयआर स्टार, अभिनेत्री कविता कौशिकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. तिने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला असून ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत गाणी म्हणताना दिसत होती.
याच व्हिडीओसोबत तिने एक लांबलचक कॅप्शनही लिहीली होती : “तुम्ही त्यांना भाभी जी घर पर हैं, हाप्पू पलटन, जिजा जी छत पर, मॅडम मे आय कम इन, एफआयआरचे शेवटचे काही भाग, येस बॉस आणि इतर अनेक कॉमेडी शोचे लेखक म्हणून ओळखत असाल. आज मी तुम्हा सर्वांना मनोज संतोषीसाठी प्रार्थना करायला सांगते. कारण लिव्हर खराब झाल्याने ते सध्या रुग्णालयात आहेत.” असं तिने लिहीलं होतं.
View this post on Instagram
शिल्पा शिंदे घेत्ये काळजी
” बिनाफर कोहली आणि त्याची संपूर्ण टीम त्याला वाचवण्यासाठी देवदूतांसारखी लढत आहे, कृपया या अद्भुत माणसासाठी प्रार्थना करा, त्याची काळजी घेतल्याबद्दल शिल्पा शिंदेचे खूप खूप आभार. आपण सर्व मिळून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया. त्यांची लेखणी अशीच वर्षानुवर्षे चालत राहो आणि जगाला त्यांचं क्रिएटिव्ह टॅलेंट लोकांना असंच दिसत राहो ” असेही कविता कौशिक यांनी लिहीलं आहे.
कविता कौशिकच्या पोस्टनंतर लगेचच अनेक सहकलाकारांनी पोस्टच्या टिप्पणी विभागात मनोज यांच्या तब्येतीबाबत कमेंट्स करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली.