फक्त गायिकाच नाही तर, अभिनेत्रीही होत्या लता मंगेशकर, झळकल्या होत्या बोनी कपूरच्या सिनेमात

Bharatratn Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांनी सिनेमात देखील साकारली आहे भूमिका, बोनी कपूर यांनी सांगितलं फार जुना किस्सा..., आजही लता मंगेशकर कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

फक्त गायिकाच नाही तर, अभिनेत्रीही होत्या लता मंगेशकर, झळकल्या होत्या बोनी कपूरच्या सिनेमात
| Updated on: Feb 01, 2025 | 10:31 AM

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) आज आपल्यात नसल्यातरी, त्यांची गाणी आणि आठवणी कायम जगण्याची नवी उमेद देतात. लता मंगेशकर यांनी 14 भाषांमध्ये तब्बल 50 हजारापेक्षा अधिक गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, लता मंगेशकर फक्त गायिकाच नाही तर, अभिनेत्री देखील होत्या. बोनी कपूर यांच्या एका सिनेमात लता दीदी यांनी भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी मोठा खुलासा केला होता. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी बोनी कपूर यांनी आव्हान केलं होतं. ‘एक तू ही भरोसा’ गाण्यात अभिनयासाठी लता मंगेशकर नाही तर, मदर टेरेसा यांना तयार कर. त्यानंतर बोनी कपूर यांनी लता दीदी यांच्या होकारासाठी अनेक प्रयत्न केले.

सिनेमाचा शुट झालेल्या सर्व पार्ट बोनी कपूर यांनी लता दीदी यांना दाखवला. त्यानंतर लता दीदी यांना विनंती करत बोनी कपूर म्हणाले, ‘या सीनला न्याय देण्याऱ्या एक तुम्हीच आहात…’ पुढे बोनी कपूर म्हणाले. ‘राजकुमार संतोषी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, या भूमिकेसाठी एका पवित्र व्यक्तीची गरज आहे…. ‘

‘तेव्हा मदर टेरेसा यांचं निधन झालं होतं. अशात लता मंगेशकर यांच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.’ भूमिका साकारण्यासाठी बोनी कपूर यांनी अनेकदा लता मंगेशकर यांच्या विनंत्या केल्या. अखेर लता मंगेशकर भूमिका साकारण्यासाठी तयार झाल्या.

बोनी कपूर म्हणाले, ‘लता दीदी हैदराबाद याठिकाणी आल्या. महिनाभर त्या हैदराबाद येथेच होत्या. आम्ही रात्री गाण्याची शुटिंग केली. तेव्हा लता दीदी यांची प्रकृती देखील ठिक नव्हती. पण असं असताना देखील त्यांनी शुटिंगमध्ये सहकार्य केलं…’

बोनी कपूर यांनी सांगितल्या नुसार, लता मंगेशकर यांना गाणं आणि भूमिका दोन्ही फार आवडल्या. ‘मी स्वतःल खूप भाग्यवान मानतो. कारण माझ्या सिनेमात लता दीदी स्क्रिनवर गाताना पाहण्यात आलं… ही एक फार मोठी गोष्ट आहे…’, बोनी कपूर यांच्या ‘पुकार’ सिनेमात लता मंगेशकर यांनी भुमिका साकारली होती.