Drugs Case | कॉमेडियन भारती सिंहसह हर्षला 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; सोमवारी जामिनावर सुनावणी होणार!

न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Drugs Case | कॉमेडियन भारती सिंहसह हर्षला 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; सोमवारी जामिनावर सुनावणी होणार!

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limachiyaa) यांना अटक केली होती. कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किला कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर सोमवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे (Bharti Singh And Harsh Limbachiyaa apply for bail after NCB Arrest).

(Bharti Singh And Harsh Limbachiyaa apply for bail after NCB Arrest)

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना थेट कोर्टात हजर केले गेले. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली.

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती.

(Bharti Singh And Harsh Limbachiyaa apply for bail after NCB Arrest)

(Bharti Singh And Harsh Limbachiyaa apply for bail after NCB Arrest)

ड्रग्ज तस्कराने घेतले भारती-हर्षचे नाव

एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

(Bharti Singh And Harsh Limbachiyaa apply for bail after NCB Arrest)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *