AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोजपुरी अभिनेते रवी किशन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील ‘या’ सदस्याचं निधन

आता वर्षभराच्या आतच राम किशन यांनी जगाचा निरोप घेतला. वर्षभराच्या काळातच दोन्ही भावांना गमावल्याने रवी किशन यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भोजपुरी अभिनेते रवी किशन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील 'या' सदस्याचं निधन
Ravi KishanImage Credit source: Facebook
| Updated on: Feb 05, 2023 | 5:03 PM
Share

मुंबई: भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी किशन यांचे मोठे बंधु राम किशन शुक्ला यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रवी किशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. बंधु राम किशन यांचा फोटो पोस्ट करत रवी किशन यांनी शोक व्यक्त केला.

‘माझे मोठे बंधु राम किशन शुक्ला यांचं मुंबईतील नानावटी रुग्णालयात दुपारी 12 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं. या पोस्टवर भोजपुरी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी कमेंट करत राम किशन यांना श्रद्धांजली वाहिली.

View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

दिनेश लाल उर्फ निरहुआ, आम्रपाली दुबे, अक्षरा सिंह, राजेश नायर यांसारख्या कलाकारांनी कमेंट लिहित शोक व्यक्त केला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रवी किशन यांच्या आणखी एका मोठ्या भावाचं निधन झालं होतं. रमेश शुक्ला असं त्यांचं नाव होतं. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली होती.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता वर्षभराच्या आतच राम किशन यांनी जगाचा निरोप घेतला. वर्षभराच्या काळातच दोन्ही भावांना गमावल्याने रवी किशन यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राम किशन हे मुंबईत राहून रवी किशन यांच्या प्रॉडक्शनचं काम पाहायचे. रविवारी दुपारी काम करताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राम किशन हे रवी किशन यांच्या तीन भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ होते. त्यांना 25 वर्षांचा एक मुलगा आहे. तर त्यांच्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!