Ravi Kishan: रवी किशन यांची 3 कोटी रुपयांची फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण?

रवी किशन यांनी पोलिसांत घेतली धाव; तपास सुरू

Ravi Kishan: रवी किशन यांची 3 कोटी रुपयांची फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण?
MP Ravi Kishan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 12:55 PM

मुंबई- प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे (Gorakhpur) भाजपचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. रवी किशन यांची तीन कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोरखपूरच्या कँटॉनमेंट पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. एका बिल्डरने त्यांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत. रवी किशन यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 406 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईस्थित एका व्यावसायिकाने त्यांची फसवणूक केल्याची माहिती रवी किशन यांच्या पीआर अधिकाऱ्याने दिली. 2012 मध्ये त्यांनी जैन जितेंद्र रमेश यांना तीन कोटी रुपये दिले होते. हेच पैसे परत मागितले तर त्याने रवी किशन यांची फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा

संबंधित व्यावसायिकाने रवी किशन यांना 34 लाखांचे 12 चेक दिले. यापैकी एक चेक बँकेत जमा केला असता, तो बाऊन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रवी किशन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

एप्रिल महिन्यात रवी किशन यांनी ट्विट करत आपल्या वैयक्तिक समस्यांचा उल्लेख केला होता. आई कॅन्सर पीडित असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं होतं. रवी किशन यांच्या आईवर मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रवी किशन यांनी बॉलिवूड, भोजपुरी, मराठी, तेलुगू, कन्नड आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. भोजपुरी मनोरंजनविश्वातील ते सुपरस्टार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.