Ravi Kishan Net Worth | भोजपुरी सुपरस्टार रवी किशन करतो लाखोंची कमाई, जाणून घ्या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?

रवी किशन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. प्रसिद्धीशिवाय रवी किशननेही (Ravi Kishan) चांगली कमाई देखील केली आहे.

Ravi Kishan Net Worth | भोजपुरी सुपरस्टार रवी किशन करतो लाखोंची कमाई, जाणून घ्या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?
रवी किशन

मुंबई : रवी किशन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. प्रसिद्धीशिवाय रवी किशननेही (Ravi Kishan) चांगली कमाई देखील केली आहे. गेल्या काही वर्षांत रवी किशनची संपत्ती तब्बल 24 टक्क्यांनी वाढली आहे. त्याची कमाई फक्त अभिनयातून नव्हे, तर ब्रँड अ‍ॅन्डोसेर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून झाली आहे. तर आज, रवी किशन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या एकूण संपत्ती, मासिक वेतन, घर आणि कर कलेक्शन याबद्दल सांगणार आहोत…

कॅकॉन्ज डॉट कॉमच्या अहवालानुसार रवी किशनची एकूण मालमत्ता 18 कोटी आहे. त्याचे मासिक उत्पन्न आणि मानधन 25 लाखांहून अधिक आहे आणि वार्षिक उत्त्पन्न 3 कोटींहून अधिक आहे.

घर

रवी किशन उत्तर प्रदेशात राहतो. 2011 मध्ये त्याने तिथेच एक लक्झरी घर खरेदी केले होते, ज्याची किंमत 72 लाख होती. याशिवाय त्याच्याकडे बर्‍याच मालमत्ता आहेत, परंतु त्याच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

कार

रवी किशनकडे तसा वाहनांचा संग्रह फारच कमी आहे. मात्र, यात लक्झरी कारचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, रवीकडे मर्सिडिज बेंझ आणि टोयोटा कार आहेत.

अभिनेता आणि राजकारणी असण्याव्यतिरिक्त रवी किशन यांचे अनेक व्यवसाय देखील आहेत. यामुळे त्याची नेट वर्थ दरवर्षी वाढत जाते. कमाईसोबतच रवी किशन वर्षाकाठी बर्‍यापैकी दान देखील करतो. त्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा धर्मादाय कार्यक्रम आणि संस्थांसाठी दिला जातो. याशिवाय तो करातही मोठी रक्कम भरतो.

रवी किशनचे व्यावसायिक जीवन

1992 मध्ये रिलीज झालेल्या ‘पितांबर’ या चित्रपटाने रवी किशनने चित्रपटांच्या जगात पदार्पण केले होते. यानंतर त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर 2003 मध्ये रवी किशनने भोजपुरी इंडस्ट्रीत ‘सईया हमार’ चित्रपटाद्वारे प्रवेश केला.

रवी किशनने बॉलिवूड, भोजपुरी, मराठी, तेलुगु, कन्नड आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. शेवट रवी किशन कन्नड चित्रपट ‘रॉबर्ट’मध्ये दिसला होता. सध्या रवी किशनचे 3 चित्रपट रिलीज होणार आहेत, ज्यात 1 हिंदी आणि 2 भोजपुरी आहेत. ‘बूंदी रायता’ हा हिंदी चित्रपट असून, 2 भोजपुरी चित्रपट ‘राधे’ आणि ‘सबसे बडा चॅम्पियन’ हे आहेत.

(Bollywood actor Ravi Kishan Net Worth)

हेही वाचा :

Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत…

Happy Birthday Ravi Kishan | घरातून केवळ 500 घेऊन स्वप्न पुरी करायला निघालेला रवी किशन, आजमितीला कामातोय कोटींचा गल्ला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI