Bhumi Pednekar हिची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल, मोठी अपडेट समोर

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर हिची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीचा रुग्णालयातील पहिला फोटो आला समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमी पेडणेकर हिच्या प्रकृती र्चचा, चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता... अभिनेत्रीला झालं तरी काय?

Bhumi Pednekar हिची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल, मोठी अपडेट समोर
| Updated on: Nov 22, 2023 | 1:38 PM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची प्रकृती खालावली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमी हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्रील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीचा रुग्णालयातील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. भूमी पेडणेकर हिने स्वतः रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री डेंग्यू झाल्याची माहिती दिली आहे. बुधवारी सकाळ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर सध्या भूमी पेडणेकर हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चाहत्यांना सावध आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र फत्क आणि फक्त भूमी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

रुग्णालयातून फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘एका डेंग्यू मच्छरने मला आठ दिवस प्रचंड त्रास दिला आहे. पण आज मी उठली आणि मला चांगलं वाटलं.. म्हणून एक सेल्फीतर काढायलाच हवी…’ अलं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत.

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मित्रांनो, सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. अशा वेळी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा आणि डासांपासून बचाव करणं फार महत्त्वाचं आहे. प्रदुषणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित झाली आहे. माझ्या ओळखीतल्या अनेकांना डेंग्यू झाला आहे. अदृश्य विषाणूने माझी प्रकृती खालावली आहे.’

एवढंच नाही तर, अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स, कुटुंबाचे देखील आभार मानले आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शिवाय भूमी हिची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना देखील करत आहेत.

भूमी पेडणेकर हिचे आगामी सिनेमे

नुकताच भूमी पेडणेकर हिचा ‘थँक्यू फॉर कमिंग’ सिनेमा प्रदर्शित झाला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकला नाही. चाहते देखील आता भूमी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. भूमी पेडणेकर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.