Bhumi Pednekar: ‘अरेच्चा! ही तर उर्फी 2.0’, अजब फॅशनमुळे भूमी पेडणेकर झाली ट्रोल

भूमी पेडणेकरची उर्फी जावेदशी केली तुलना; म्हणाले 'ही कसली फॅशन?'

Bhumi Pednekar: अरेच्चा! ही तर उर्फी 2.0, अजब फॅशनमुळे भूमी पेडणेकर झाली ट्रोल
Bhumi Pednekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 01, 2022 | 3:02 PM

मुंबई: अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच प्रमोशननिमित्त तिने नुकतेच इन्स्टाग्राम काही फोटो पोस्ट केले आहेत. भूमीचे हे फोटो साडीतील आहेत. मात्र तरीही तिची स्टायलिंग नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. या फोटोंमधील भूमीचा फॅशन सेन्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी ही तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत असते. आता बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा तिच्या पावलांवर पाऊल टाकत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली.

भूमीने निळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा जरी वर्कचा ब्लाऊज परिधान केला आहे. मात्र तिच्या ब्लाऊजची डिझाइन नेटकऱ्यांना पसंत पडली नाही. त्यावरूनच तिला ट्रोल केलं जातंय. ‘माझ्या खास मित्राच्या लग्नासाठी..’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

‘हा कोणत्या प्रकारचा फॅशन सेन्स आहे हेच कळत नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘अत्यंत वाईट डिझाइन आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘उर्फीकडून प्रेरणा घेतली वाटतं’, अशीही टीका एका युजरने केली आहे. ‘उर्फी जावेद 2.0’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी भूमीची खिल्ली उडवली.

भूमीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट येत्या 16 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.