गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरातच, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय, अत्यंत मोठी माहिती पुढे..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरीच असल्याचे देखील कळत आहे.

गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरातच, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय, अत्यंत मोठी माहिती पुढे..
Salman Khan
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 12:59 PM

बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर पहाटे पाच वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ देखील करण्यात आलीये. मात्र, असे असताना देखील सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झालाय. आता याच गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे.

सलमान खान ज्या गॅलरीत येऊन आपल्या चाहत्यांना भेटतो, त्याच गॅलरीच्या भोवती हा गोळीबार झाल्याचे कळत आहे. गोळीबाराच्या 4 ते 5 राउंड फायर झाल्या आहेत. अगोदर असे सांगितले जाते होते की, सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला. मात्र, तसे नसून सलमान खानच्या गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. पहाटे हा गोळीबार झाल्यानंतर घरातील जवळपास सर्वच सदस्य हे घरात असल्याचे सांगितले जातंय. आता या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास हा केला जातोय, या प्रकरणात मोठे खुलासे पोलिसांकडून केले जाऊ शकतात.

या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ हा पुढे आलाय. दोनजण दुचाकीवर दिसत आहेत. मात्र, या दोनजणांचा चेहरा हा पूर्ण झाकलेला दिसतोय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी मुंबईतील नसून राजस्थान किंवा हरियाणा भागातील असावीत. या प्रकरणात चार सुरक्षारक्षकांचे बयान पोलिसांकडून घेण्यात आले असून पुढील चाैकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ज्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला ती 7.6 बोअरची बंदूक आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडूनच हा गोळीबार केला असावा असा अंदाज काढला जातोय. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी ही मिळत आहे. मात्र, लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून अजूनही या प्रकरणाची जिम्मेदारी घेण्यात नाही आली.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.