सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण कोर्टाचा निर्णय, मोठी अपडेट समोर
Salman Khan House Firing Case Update: सलमान खान गोळीबार प्रकराणीतील आरोपीने कोर्टाला सांगितली अनेक कारणं..., मोठी अपडेट अखेर समोर... 14 एप्रिल 2024 मध्ये सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला.

Salman Khan House Firing Case Update: अभिनेता सलमान खान ( Salman Khan) याच्या वांद्रे येथील झालेल्या गोळीबार प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. याप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय सुनानलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित मोहम्मद रफिक सरदार चौधरी याला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर मोहम्मद रफिक सरदार चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. सोमावरी याप्रकरणी मोठा निर्णय सुनावलेला आहे.
गोळीबार प्रकरणी कोर्टाने सांगितल्यानुसार, चौधरी याने गोळीबार गुन्ह्यात सर्वात मोठी भूमिका बजावली होती आणि त्याने जाणूनबुजून या गुन्ह्यात भाग घेतला होता. तपासात असं दिसून आलं की, घटनेच्या दोन दिवस आधी मोहम्मद रफिक चौधरी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर दिसला होता. त्याने एक रेकी व्हिडिओ शूट केला होता आणि तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईला पाठवला होता.
कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज
चौधरी याने त्याच्या जामीन अर्जात कोर्टाला अनेक कारणं दिली, ज्यात एफआयआर दाखल करण्यास विलंब, पुराव्यांचा अभाव आणि त्यांच्याविरुद्ध पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसणं यांचा समावेश होता. पण, विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी याला कडाडून विरोध केला. चौधरी गुन्ह्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सहभागी होता, असं त्यांनी सांगितलं. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला.
कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की आरोपीने गुन्ह्यातून आर्थिक फायदा मिळवला होता आणि मोक्का कायद्यांतर्गत जामिनाच्या अटी पूर्ण करण्यात तो अयशस्वी ठरला होता.
इतर आरोपी कोठडीत
सध्या चौधरी याच्यासोबत अनेक आरोपी न्यायालयीन कोठडी आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून नाव दिले आहे. सांगायचं झालं तर, 14 एप्रिल 2024 मध्ये सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला.
