AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, बिग बींचा व्हिडीओ पाहून म्हणाल…

Amitabh Bachchan | खुद्द अमिताभ बच्चन यांनी दिली प्रकृतीची माहिती, रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी येताच बिग बींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चर्चा...

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, बिग बींचा व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Mar 16, 2024 | 8:12 AM
Share

मुंबई | 16 मार्च 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात दाखल असल्याच्या बातमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. शुक्रवारी अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. एवढंच नाहीतर, बिग बींवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असं देखील सांगण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या हृदयाची नाहीतर, पायातील गुठळ्यासाठी अँजिओप्लास्टी केली आहे.

शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमिेताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. सांगायचं झालं तर, बिग बी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. पण आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिग बी मुलगा अभिषेक बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत. ‘आईएसपीएल टी10’ सामन्या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचवेळी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

सामना संपल्यानंतर बाहेर आलेल्या अमिताभ बच्चन यांना चाहते आणि पापाराझी यांना घेरलं. तेव्हा बिग बी यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांना प्रकृतीबद्दल सांगितलं. सुरुवातील अमिताभ बच्चन हैराण झाले आणि नंतर ‘फेक न्यूज’ असल्याचं सांगितलं. ज्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

अमिताभ बच्चन लवकरच ‘सेक्शन 84’, ‘कल्कि 2898 – ऐ डी’, ‘आंखें 2’ आणि ‘तेरा यार हूं मैं’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात बिग बी मुख्य भूमिकेत दिसतील. चाहते देखील अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बिग बी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असतात. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, जगभरात आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Follow Us
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल