AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जन्नते सजाई मैंने तेरे लिए…’ Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे? 16 वर्षांनंतर दिसू लागलीये अशी…

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त 'जन्नते सजाई मैंने तेरे लिए...' गाण्याची क्रेझ पाहायला मिळालेली. गाण्यात झळकलेली अभिनेत्री देखील एका रात्रीत स्टार झाली.. पण त्यानंतर ती अभिनेत्री कुठे गायब झाली, कोणालाच काही कळलं नाही... आता 16 वर्षांनंतर ती कशी दिसू लागलीये पाहा...

'जन्नते सजाई मैंने तेरे लिए...' Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे? 16 वर्षांनंतर दिसू लागलीये अशी...
Aruna Shields
| Updated on: Jul 14, 2026 | 9:22 AM
Share

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी देखील लागला. पण आज त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्या एक दोन गाण्यातून प्रसिद्धी झोतात आल्या. एका रात्रीत त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली. पण त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम करु शकल्या नाहीत. अखेर त्यांनी झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला आणि स्वतःचं एक वेगळं विश्वा निर्माण केलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, अरुणा शील्ड्स (Aruna Shields)…

अरुणा शील्ड्स एक अशी अभिनेत्री जी एका रात्रीत प्रसिद्ध झाली, पण आज ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणालाच माहिती नाही. अरुणा शील्ड्स हिने अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्यासोबत ‘प्रिन्स’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमा बॉक्स ऑफिस फ्लॉप ठरला पण सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील तेरे लिए (Tere Liye) हे गाणं तर चार्टबस्टर ठरलं… गाण्यातील अरुणा आणि विवेक यांच्या केमेस्ट्रीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर देखील अरुणी हिने इंडस्ट्रीला राम राम ठोकला. तर, अरुणा आता कुठे आहे? ती काय करते? आणि तिच्या लूकमध्ये किती बदल झाला आहे? बॉलीवूडमधील ‘प्रिन्स’ या ॲक्शन-थ्रिलर सिनेमात ‘माया’ची मुख्य भूमिका साकारून शील्ड्सने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. तिने स्वतःच आपले स्टंट्स केले आणि भारतातील पहिल्या महिला ॲक्शन हिरोंपैकी एक म्हणून तिचं सर्वत्र कौतुक झालं

आता काय करते अरुणा?

अभिनयाच्या क्षेत्रातून जाणीवपूर्वक ब्रेक घेतल्यानंतर, शील्ड्स हिने मानसशास्त्र आणि अध्यात्माच्या अभ्यासात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तिने ‘गिल्डहॉल स्कूल ऑफ म्युझिक अँड ड्रामा’मधून विशेष प्राविण्यासह शिक्षण पूर्ण केलं आणि ‘सेंट्रल सेंट मार्टिन्स’मधून पदवी प्राप्त केली. तिने ‘रिटर्न टू काम’ (Return To Calm) नावाने हिप्नोथेरपी आणि सायक्योथेरपीचा खाजगी व्यवसाय सुरू केला; या माध्यमातून अरुणा लंडन, सिलिकॉन व्हॅली आणि लॉस एंजेलिसमधील आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी सेवा देते.

‘तेरे लिए’ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, या लोकप्रिय गाण्याला पाकिस्तानी गायक आतिफ असलम (Atif Aslam) आणि भारतीय गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने आवाज दिलेला. गाण्याला प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील गाणं चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

Follow Us