AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arti Singh | “मी पूर्णपणे एकटी पडले”; गोविंदाच्या भाचीकडून मानसिक आरोग्याविषयी खुलासा

अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिने तिच्या पोस्टमध्ये मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पॅनिक अटॅक येत असल्याचंही तिने म्हटलंय.

Arti Singh | मी पूर्णपणे एकटी पडले; गोविंदाच्या भाचीकडून मानसिक आरोग्याविषयी खुलासा
Arti SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 14, 2023 | 2:41 PM
Share

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस 13’ची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरती ही अभिनेता गोविंदाची भाची आणि कॉमेडीयन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. आरतीच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये आरतीने तिच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला आहे. त्याचसोबत आपल्याला पॅनिक अटॅक येतात, असंही तिने सांगितलंय. 2017 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणारी आरती बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये झळकली होती. तिने बऱ्याच मालिकांमध्ये सोज्वळ सुनेपासून खलनायकी भूमिकेपर्यंत विविध छटा साकारल्या आहेत.

आरतीने सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तुमच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला एकटं आणि मन सुन्न झाल्यासारखं वाटतं. मी माझ्या पॅनिक अटॅकविषयी मोकळेपणे बोलत आली आणि गेल्या काही दिवसांपासून मला पॅनिक अटॅक येतायत. मला एकटं पडल्यासारखं वाटतं आणि दररोज उठून मी त्या परिस्थितीचा सामना करतेय. कारण मला सेटवर जाऊन शूट करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. पण मला हेसुद्धा माहीत आहे की मी लढू शकते. हीच परिस्थिती कायम राहणार नाही. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलते.’

‘मी माझ्या मानसिक स्थितीबद्दल मोकळेपणाने बोलतेय, कारण असे असंख्य जण असतील जे याबद्दल मौन बाळगून असतील. मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही एकटेच अशा परिस्थितीचा सामना करत नाही आहात. कोण याबद्दल काय विचार करतं मला त्याने काहीच फरक पडत नाही. देवच आपल्याला हिंमत देतो. तुमची सतत काळजी घेणारा कोणीतरी आहे, हे विसरू नका’, असं तिने पुढे लिहिलं आहे.

आरतीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आरती सध्या ‘श्रावणी’ या मालिकेत भूमिका साकारतेय. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.