AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill हिला गुपचूप डेट करतोय ‘हा’ अभिनेता? म्हणाला, ‘दुःख होतं बिचारी…’

सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल हिच्या आयु्ष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; शहनाज हिच्याबद्दल 'या' अभिनेत्याचं मोठं वक्तव्य... सर्वत्र शहनाज हिची चर्चा...

Shehnaaz Gill हिला गुपचूप डेट करतोय 'हा' अभिनेता? म्हणाला, 'दुःख होतं बिचारी...'
| Updated on: May 10, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री शहनाज गिल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘बिग बॉस’ मध्ये आपल्या स्वभावामुळे शहनाज हिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ‘बिग बॉस १३’ नंतर कायम सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शहनाज गिल हिने अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकला नाही, पण शहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान भाईजान याने शहनाजला Move On करण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे सलमान आणि शहनाज तुफान चर्चेत आले होते. गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिल अभिनेता राघव जुयाल याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

रंगणाऱ्या चर्चांवर अखेर राघव याने मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने शहनाज हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शहनाज माझी फक्त चांगली मैत्रीण आहे… असा खुलासा राघव याने एका मुलाखतीत केला आहे. सध्या सर्वत्र राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

पुढे राघव म्हणाला, ‘मी माझ्या इतर मित्रांसोबत देखील फिरायला जातो.. वेळ व्यतीत करतो.. पण तिच्यासोबत (शहनाज) अनेक चर्चा रंगल्या. मला नाही माहिती हे काय आहे… दुःख होतं… बिचारी…’ राघव कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शहनाज हिच्यासोबत देखील अभिनेत्याला अनेकदा स्पॉट करण्यात आलं.

शहनाज हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

पण गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि राघव जुयाल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत आहे. शहनाज आणि राघव याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शहनाज आणि राघव ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?