Bigg Boss 14 | ‘काका पळू नका, वयाच्या दृष्टीने ठीक नाही’, राहुल वैद्यचा एजाज खानला टोला!

टास्क दरम्यान एजाज आणि राहुल यांच्यात भांडण झाले. मात्र, शेवटी या टास्कमध्ये एजाज खान विजयी झाला.

Bigg Boss 14 | ‘काका पळू नका, वयाच्या दृष्टीने ठीक नाही’, राहुल वैद्यचा एजाज खानला टोला!
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 10:44 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या घरात प्रेक्षकांना एक नवा वाद पाहायला मिळाला आहे. निक्की आणि पवित्रानंतर आता एजाज खान (Eijaz Khan) आणि राहुल वैद्यमध्ये (Rahul Vaidya) शाब्दिक चकमक झाली आहे. घरात आल्यापासून या दोघांमध्ये तितकीशी मैत्री नव्हतीच! मात्र, आता दोघांमध्ये ऑनस्क्रीनही मोठा वाद झाला आहे. या दरम्यान, राहुल वैद्यने एजाजला त्याच्या वयावरून टोकले आहे.( Bigg Boss 14 Latest Update Fight Between Eijaz Khan and Rahul Vaidya)

वास्तविक, बिग बॉसने सर्व घरातल्यांना त्यांचे वैयक्तिक सामान मिळवण्याची संधी दिली होती. त्यासाठी दोन स्पर्धकांमध्ये स्पर्धा होणार होती. त्यांना त्यांच्या बॅगमध्ये जास्तीत जास्त बॉल जमा करायचे होते. अधिक बॉल असणार्‍या स्पर्धकांना, हा टास्क जिंकण्याची आणि वैयक्तिक वस्तू मिळविण्याची संधी मिळणार होती. या टास्क दरम्यान एजाज आणि राहुल यांच्यात भांडण झाले. मात्र, शेवटी या टास्कमध्ये एजाज खान विजयी झाला.

वयावरून टीका

परंतु, या टास्क दरम्यान राहुलने इजाज खानच्या वयावर भाष्य केले. वयाचा उल्लेख करत त्याची खिल्ली उडविली. राहुल आणि एजाज दोघेही टास्क दरम्यान जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. या दरम्यान, राहुलने ऐजाजवर निशाणा साधला आणि म्हणाला, ‘काका पळू नका, तुमच्या वयाच्या दृष्टीने ते चांगले नाही’. यानंतर राहुलने निक्की तंबोलीला खेळात सामील करत, ‘आता निक्कीच तुला पाहून घेईल’, असे म्हणत एजाजला धमकी वजा इशारा दिला. (Bigg Boss 14 Latest Update Fight Between Eijaz Khan and Rahul Vaidya)

तूफानी सिनिअर हीना राहुलवर नाराज

राहुल वैद्यने खेळादरम्यान एजाजला असे बोलणे योग्य नाही, असे म्हणत हीना खानने तिची नाराजी व्यक्त केली. राहुलने ‘वया’वरून केलेली टीका हीनाला चांगलीच बोचली आहे. या टास्कमध्ये एजाज खानसह (Eijaz Khan) निशांत मलकानी आणि पवित्रा पुनिया हे स्पर्धकदेखील विजयी झाले आहेत. टास्क जिंकत त्यांनी आपापले समान परत मिळवले आहे.

‘बिग बॉस 14’च्या घरात येणार नवे तूफानी सिनिअर्स

सध्या घरात असलेले ‘तूफानी सिनिअर्स’ घराबाहेर गेल्यानंतर नव्या फ्रेशर्ससह तीन माजी स्पर्धकांची एंट्री होणार असल्याचे कळते आहे. माजी स्पर्धक असिम रियाझ, गौतम गुलाटी आणि रश्मी देसाई हे नवे ‘तूफानी सिनिअर्स’ म्हणून ‘बिग बॉस 14’मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात ज्याप्रकारे सिद्धार्थ, गौहर आणि हीना एकत्र फ्रेशर्सबाबत निर्णय घेत आहेत, त्याचप्रमाणे काही नवीन स्पर्धकदेखील निर्णय घेतील. असिम, रश्मी आणि गौतम गुलाटी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत की नाही हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आले नसले तरी, सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होत आहे. हे तिघेही गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘बिग बॉस 14’ च्या सेटवर दिसले होते.

(Bigg Boss 14 Latest Update Fight Between Eijaz Khan and Rahul Vaidya)

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी!

 पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.