AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | प्रेक्षकांना खुश करण्याच्या नादात तमाशा; डान्स करताना शालीन-अर्चना स्टेजवरच कोसळले

यावेळी घरातील स्पर्धक नाही तर बाहेरून आलेली जनता टॉप 5 स्पर्धकांची निवड करणार आहे. म्हणजेच घरात पुन्हा एकदा सामान्य जनता येणार आहे आणि आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्यांना नॉमिनेशनपासून सुरक्षित करणार आहे.

Bigg Boss 16 | प्रेक्षकांना खुश करण्याच्या नादात तमाशा; डान्स करताना शालीन-अर्चना स्टेजवरच कोसळले
Shaleen and ArchanaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2023 | 12:46 PM
Share

मुंबई: बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. अशातच या संपूर्ण आठवड्यात घरात असलेल्या स्पर्धकांना एकानंतर एक धक्कादायक गोष्टी पहायला मिळतील. आज (सोमवार) दर आठवड्यानुसार या शोमध्ये नॉमिनेशन डे पार पडणार आहे. मात्र यावेळी नॉमिनेशन फार वेगळं असेल. कारण यावेळी घरातील स्पर्धक नाही तर बाहेरून आलेली जनता टॉप 5 स्पर्धकांची निवड करणार आहे. म्हणजेच घरात पुन्हा एकदा सामान्य जनता येणार आहे आणि आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्यांना नॉमिनेशनपासून सुरक्षित करणार आहे.

बिग बॉस 16 चा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की एक-एक स्पर्धक स्टेजवर येऊन आपली ‘मन की बात’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्चना सर्वांना नमस्ते करत म्हणते की सुरुवातीपासून ती एकटीच हा खेळ खेळत आली आहे. तर शिव म्हणतो की मला तुम्हा सर्वांचं फक्त प्रेम हवंय. या शोमध्ये भाग घेण्याच्या आधीच विचार पक्का केला होता की जे करेन ते मनापासून करेन, असं प्रियांका चहर चौधरी म्हणाली.

पहा व्हिडीओ-

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे प्रेक्षकांना खुश करण्यासाठी डान्ससुद्धा करताना दिसतात. यादरम्यान शालीन भनोट आणि अर्चना गौतमसुद्धा डान्स करतात. मात्र उत्साहाच्या भरात दोघांचा तोल जातो आणि डान्स करता करता दोघं स्टेजवरच कोसळतात. या दोघांना पडताना पाहून सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

बिग बॉसच्या घरातील ज्या स्पर्धकाला सर्वांत कमी मतं मिळतील, तो घराबाहेर जाईल. म्हणजेच ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ येऊन एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. घरातून बाहेर पडणारा हा स्पर्धक अर्चना गौतम किंवा शालीन भनोट असू शकतो, असा अंदाज सोशल मीडियावर वर्तवला जात आहे. त्यामुळे या शोमध्ये पुढे काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात सहा सदस्य राहिले आहेत. यामध्ये शालीन भनोट, शिव ठाकरे, प्रियांचा चहर चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि निमृत कौर आहलुवालिया यांचा समावेश आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.