बॉयफ्रेंडने थोबाडीत सणसणीत वाजवली, वळच उमटले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Relationship : सर्वांसमोर बॉयफ्रेंडने केलेली मारहाण, शरीरावर उमटलेले वळ, आईने पाहिल्यानंतर... अत्यंत वाईट अभिनेत्रीची अवस्थ... दुःख व्यक्त करत म्हणाली...; सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा...

मुंबई| 13 डिसेंबर 2023 : बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडमध्ये कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात. नात्यामध्ये होणारे वाद कधी सहज मिटणारे असतात, तर कधी वाद टोकाला पोहोचतात. ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि फक्त वाईट आठवणी राहतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये ईशा आणि अभिषेक कायम एकमेकांसोबत बोलताना दिसतात. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ ईशा आणि समर्थ यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली आहे. अभिषेक याचं बिग बॉसच्या घरात असणं ईशा आणि समर्थ यांना बिलकूल आवडत नाही.
अनेकदा तिघांमध्ये भांडण देखील झालं. म्हणून अभिषेक कायम त्याच्या मनातील गोष्टी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला सांगत असतो, तर ईशा – समर्थ त्यांच्या खटकणाऱ्या गोष्टी विकी जैन याला सांगत असतात. दरम्यान, ईशा म्हणाली, ‘अभिषेक माझ्यासाठी खूप पझेसिव्ह होता. एक दिवस मी अभिषेक याला माझ्या मित्रांना भेटवण्यासाठी क्लबमध्ये घेवून गेली होती.’
‘क्लबमध्ये अभिषेक माझ्या सर्व मित्रांना भेटला आणि म्हणाला हे सगळे तुझे खास मित्र आहेत. मी त्याला हो म्हणाले.. तेव्हा अभिषेक याने सर्वांसमोर मला थोबाडीत सणसणीत वाजवली. सर्वांसमोर अभिषेक याने मारल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. त्याने कानाखाली मारल्यामुळे वळ देखील उमटले होते. असं असताना मी दुसऱ्या दिवशी शुटिंगसाठी गेली…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आईने जेव्हा पाहिलं, तेव्हा तिला कळलं की हे सर्वकाही अभिषेक याने केलं आहे. जेव्हा मी अभिषेक याच्यासोबत नातं तोडलं, तेव्हा तो माझ्या बिल्डिंग खाली यायचा आणि जोर-जोरात गाडीचा हॉर्न वाजवायचा. एक दिवस तर तो माझ्या घरी आला आणि मोठ-मोठ्याने वाद घालू लागला. तेव्हा सिक्योरिटी आला आणि अभिषेक याला बाहेर काढलं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक आणि ईशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगलेल्या असतात. वाईट आठवणी असल्यामुळे दोघांचं नातं तुटलं. पण ब्रेकअपनंतर देखील अभिषेक ईशा हिला विसरु शकलेला नाही. अंकिता हिला अभिषेक कायम ईशा हिच्याबद्दल बोलताना दिसतो.
