Bigg Boss 17 : प्रीमिअरच्या काही तास आधीच स्पर्धकाची माघार; शोमध्ये होणार नाही सहभागी

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो 'बिग बॉस' एका नव्या सिझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या रविवारी म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडणार आहे. यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Bigg Boss 17 : प्रीमिअरच्या काही तास आधीच स्पर्धकाची माघार; शोमध्ये होणार नाही सहभागी
Bigg Boss 17Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 5:13 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा सतरावा सिझन येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे आणि या प्रीमियरदरम्यान शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावरून पडदा उचलण्यात येणार आहे. मात्र बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच एका स्पर्धकाने माघार घेतली आहे. ही स्पर्धक आता सलमान खानच्या या शोमध्ये सहभागी होणार नाही. यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र तिच्या टीमने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे की ती आता ‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी होणार नाही. अखेरच्या क्षणी माघार घेणारी ही स्पर्धक माजी मिस इंडिया मनस्वी ममगई आहे.

मनस्वीने अचानक हा निर्णय का घेतला याबद्दल तिने मौन बाळगलं आहे. गुरुवारी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपल्या परफॉर्मन्सची शूटिंग पूर्ण केली होती आणि शुक्रवारी त्यांना बिग बॉसच्या घरात प्रवेश करायचं होतं. मनस्वीसुद्धा या शोमध्ये एण्ट्री करणार होती. याबद्दल तिने माध्यमांसमोर प्रतिक्रियासुद्धा दिली होती. बिग बॉस मध्ये सहभागी होण्यास मी फार उत्सुक आहे, असं तिने म्हटलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी मनस्वी आणि शोचे निर्माते यांच्यात काही मतभेद झाले आणि त्या कारणामुळेच या शोमध्ये सहभागी होत नसल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by MANASVI (@imanasvi)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसचे निर्माते आणि मनस्वी यांच्यात बऱ्याच मुद्द्यांवरून मतभेद होते. यासोबतच काही वैद्यकीय तक्रारीमुळेही ती शोमध्ये सहभागी होत नसल्याचं समजतंय. मात्र निर्मात्यांकडून याबद्दल अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मनस्वीने 2010 मध्ये ‘मिस इंडिया वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. तर ‘मिस वर्ल्ड 2010’ मध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

मनस्वीकडे ‘मिस इंडिया टुरिझम इंटरनॅशनल’ आणि ‘मिस टुरिझम इंटरनॅशनल 2008’चाही किताब आहे. यासोबतच ती सध्या अभिनयात आपलं नशीब आजमावतेय. अभिनेत्री काजोलसोबत ती ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये नुकतीच झळकली होती. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.

‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत मुनव्वर फारुकी, ऐश्वर्या शर्मा, निल भट्ट, अंकिता लोखंडे, विकी जैन, ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, माजी पत्रकार जिग्ना वोरा यांची नावं चर्चेत आहे. ‘बिग बॉस’चं ग्रँड प्रीमियर रविवारी रात्री नऊ वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.