
Salman Khan Home: अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता लवकरच सलमान खान त्याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ च्या माध्यमातून चाहच्यांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉसचं यंदाचं सीझन देखील खास असणार आहे. राजकीय वर्तुळाभोवती यंदा बिग बॉसची थिम आधारलेली आहे. ‘घरवालों की सरकार’ मध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 19’ 24 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
आता हळू – हळू ‘बिग बॉस 19’ शोच्या स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर देखील ‘बिग बॉस 19’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, शोच्या निर्मात्यांनी अनाया हिच्यासोबत संपर्क साधला आहे. पण याबद्दल अद्यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारा अनाया तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.
23 वर्षीय अनाया बांगर पुरुष होती. त्यानंतर इंग्लंड येथे जावून लिंगबदलं केलं आणि मुलगी झाली. लिंगबदल शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर अनाया भारतात आहे. भारतात परतल्यानंतर अनाया हिने लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. अनाया हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
सांगायचं झालं तर, अनाया हिने मुलगा असताना यशस्वी जयस्वा, सरफराज खान आणि भाऊ मुशीर यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे. इंग्लंड येथे देखील तिने क्लब क्रिकेट खेळलं आहे. अनाया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
अनाया हिच्या सोबतच अन्य स्पर्धकांची देखील नावे समोर आली आहेत. रती पांडे, हुनर हाली, अपूर्व मुखजा, फैजल शेख, धनश्री वर्मा, श्रीराम चंद्रा, भाविका शर्मा या सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा रंगली आहे. शिवाय ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ फेम शैलेश लोढा, गुरुचरण सिंग आणि जेनिफर मिस्त्री यांच्या नावांची देखील चर्चा सुरु आहे.
एवढंच नाही तर, ‘बिग बॉस 19’ शोमध्ये रॅपर रफ्तार, शहनाज गिल हिचा भाऊ शहबाज आणि टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, पारस कलनावत हे देखील स्पर्धक म्हणून शोमध्ये सामिर होऊ शकतात. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 19’ शोची चर्चा रंगली असून प्रेक्षक 24 ऑगस्टच्या प्रतिक्षेत आहेत.