प्रसिद्ध क्रिकेटपटूने अभिनेत्रीसोबत असं काय केलं, ज्यामुळे थरथर कापू लागली अभिनेत्री, म्हणाली…
Actress Life: लोकप्रिय क्रिकेटर असल्यामुळे त्याने मला..., अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, क्रिकेटपटूने तिच्यासोबत असं केलं तरी काय? मोठं रहस्य अखेर उघड... सध्या सर्वत्र अभिनेत्रीने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

Actress Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक घटना घडतात ज्या समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसतो. बाहेरून अधिक आकर्षक वाटणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये अशा काही घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. पूर्वी सेलिब्रिटी याबद्दल व्यक्त होणं टाळत होते. पण आता पूर्वी सारखा काळ राहिलेला नाही. आता सेलिब्रिटी त्यांच्या आलेले वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असातात. आता देखील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने क्रिकेटवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस 18’ मध्ये अभिनेता सलमान खान याला भिडणारी कशिश कपूर आहे… नुकताच झालेल्या मुलाखतीत कशिश हिने धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. एका लोकप्रिय क्रिकेटरने केलेल्या गैरवर्तनावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. कशिश म्हणाली, ‘तो एक प्रचंड लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. ती वेळ माझ्यासाठी प्रचंड वाईट होती. मी थरथर कापत होती. कारण त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं होतं. त्याच्या या गोष्टीला मी विरोध केला. मी त्या म्हणाली, तू क्रिकेटर असशील तर तुझ्या घरचा…’
‘माझ्यासाठी तू फक्त एक क्रिकेटर आहेत. मला इम्प्रेस करतोय… तू क्रिकेटर आहेस म्हणून मी कधीच तुझ्यावर इम्प्रेस होणार नाही… तू क्रिकेटर आहेस, क्रिकेट खेळणं तुझं काम आहे आणि याचा मी सन्मान करते… पण माझ्यासाठी तू करत असलेली फलंदाजी गोलंदाजी काही फायद्याची ठरणार नाही…’ असं अभिनेत्री क्रिकेटर ठणकाऊन सांगितलं. अभिनेत्रीने मोठा खुलासा केला पण त्याचं नाव सांगितलं नाही…
कशीश कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर कशीश हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीला 1.2 फॉलोअर्स फॉलो करतात… अभिनेत्री व्लॉगिंग देखील करते, शिवाय तिने ‘मिस फॅशन आयकॉन’ हा पुरस्कार देखील मिळलला आहे. अभिनेत्री चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देत असते.
