शिल्पा शेट्टा आणि राज कुंद्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 60 कोटींचं प्रकरण, आता कोणाची केली फसवणूक?
Shilpa Shetty And Raj Kundra: तब्बल 60 कोटी रुपयांची उलाढाल, शिल्पा शेट्टी आणि नवरा राज कुंद्रा पुन्हा मोठ्या अडचणीत, सेलिब्रिटी कपलने आता कोणाची केली फसवणूक?

Shilpa Shetty And Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नवरा राज कुंद्रा गेल्या काही वर्षांपासून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा याला अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा शिल्पा आणि राज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील एका उद्योजकाची फसवणूक केल्याचे आरोप शिल्पा आणि राज यांच्यावर आहेत. तब्बल 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप दोघांवर आहेत. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जोडप्यावर मुंबईतील एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने जुहू पोलिस ठाण्यात शिल्पा आणि राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या फसवणुकीत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा समावेश असल्याने पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध 60 वर्षीय दीपक कोठारी यांनी 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दीपक कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक आहेत.
काय आहे पूर्ण प्रकरण?
दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या खटल्यानुसार, राजेश आर्य यांनी त्यांची शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख करून दिली होती. राज आणि शिल्पा बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. ते एक होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होतं. दाखल केलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी शिल्पा आणि राज यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं, ज्यावर त्यांना 12 टक्के व्याज द्यावं लागलं. हे व्याज टाळण्यासाठी, सेलिब्रिटी कपलने रकमेत फेरफार केला आणि ती कर्जाऐवजी कंपनीत गुंतवणूक म्हणून दाखवली. प्रत्येक महिन्याला रक्कम परत करण्याचं वचन देखील राज आणि शिल्पा यांनी दिलं होतं. पण ते पूर्ण करण्यात आलं नाही.
एफआयआरनुसार, शिल्पा शेट्टी या व्यवहाराची साक्षीदार होती, परंतु तिने सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. दीपक कोठारी यांना नंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या पूर्वीच्या कारनाम्यांची जाणीव झाली. आता शिल्पा आणि राज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
