AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 19’मध्ये ‘त्या’ दिवंगत अभिनेत्याचं नाव घेणाऱ्या स्पर्धकावर भडकला सलमान; म्हणाला “तुझ्या जोरावर..”

वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने या स्पर्धकाची चांगलीच शाळा घेतली. दिवंगत अभिनेत्याच्या नावाचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

'बिग बॉस 19'मध्ये 'त्या' दिवंगत अभिनेत्याचं नाव घेणाऱ्या स्पर्धकावर भडकला सलमान; म्हणाला तुझ्या जोरावर..
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2025 | 4:41 PM
Share

‘बिग बॉस 19’मधील ‘वीकेंड का वार’ ड्रामाने भरलेला असतो. सूत्रसंचालक सलमान खान या एपिसोडमध्ये कोणाची शाळा घेणार, कोणाला फटकारणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष असतं. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने काही स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. यामध्ये नीलम गिरी, तान्या मल्होत्रा आणि कुनिका सदानंद यांचा समावेश होता. मुद्दा होता अशनूर कौरच्या बॉडीशेमिंगचा. यावरून सलमानने तिघींना सुनावल्यानंतर घरातील माहौल पूर्णपणे बदलला होता. त्यानंतर सलमानने त्याचा मोर्चा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बादेशाकडे वळविला. गेल्या आठवड्यात जेव्हा नॉमिनेशनमध्ये शहबाजचं नाव समोर आलं होतं, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या नावाचा वापर केला होता. सिद्धार्थच्या चाहत्यांकडून मला पाठिंबा मिळेल, असा अतिआत्मविश्वास त्याने व्यक्त केला होता. यावरूनच सलमानने आता त्याला फटकारलं आहे.

“तू सतत सिद्धार्थ शुक्लाचं नाव का घेतोय”, असा सवाल सलमानने करताच शहबाज त्याची माफी मागतो. “मी सिद्धार्थच्या चाहत्यांची भेट घेत असतो. त्यांच्याशी मी संवाद साधत असतो”, असं शहबाज सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु सलमान त्याची एक गोष्ट ऐकत नाही. “ते सिद्धार्थचे चाहते आहेत. तू काय करतोयस? तू तुझ्या जोरावर खेळ. सिद्धार्थने या शोमध्ये जे काही केलं होतं, ते स्वत:च्या जोरावर केलं होतं. त्याने कधीच कोणाचं नाव घेतलं नव्हतं”, अशा शब्दांत सलमानने राग व्यक्त केला. इतकंच नव्हे तर शहबाजची खेळी सिद्धार्थ शुक्लाच्या खेळीच्या 1 टक्केही बरोबरीचं नाही, असं रोखठोक मत सलमानने मांडलं.

“तर तुला असं वाटतं की सिद्धार्थ शुक्लाचे जे चाहते आहेत, ते ज्याची खेळी 1 टक्काही बरोबरीचं नाही, त्याला पाठिंबा देतील? तुला असं वाटतं की जर सिद्धार्थ शुक्ला इथे असता, तर त्यानेही तुला पाठिंबा दिला असता”, असा उपरोधिक आणि तितकाच संतप्त सवाल सलमान शहबाजला करतो. शहबाज हा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ आणि गायक आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला हे ‘बिग बॉस’च्या 13 व्या सिझनमध्ये स्पर्धक होते. या सिझनमध्ये दोघांची लव्ह-स्टोरी तुफान चर्चेत होती. सिद्धार्थ आणि शहनाजच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. परंतु सिद्धार्थच्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.