AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’मध्ये होणार मोठा धमाका! 18 स्पर्धकांची नावं समोर; कुठे-कधी पाहाल शो?

Bigg Boss 20 Premiere: 'बिग बॉस 20'बद्दल सोशल मीडियावर बरीच क्रेझ पहायला मिळतेय. हा शो सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, त्यांची यादी पहा..

Bigg Boss 20: सलमान खानच्या 'बिग बॉस 20'मध्ये होणार मोठा धमाका! 18 स्पर्धकांची नावं समोर; कुठे-कधी पाहाल शो?
सलमान खान Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 7:10 PM
Share

Bigg Boss 20 Primiere: अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. या शोच्या धमाकेदार सुरुवातीला आता अवघे काही तास बाकी आहेत. ‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर आज म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे हा शो तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता, त्याची वेळ काय असेल आणि या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, हे जाणून घेऊयात.

कधी आणि कुठे पाहू शकाल?

‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. हा शो तुम्हाला जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर पाहता येणार आहे. डिजिटल प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टारवर हा शो दररोज रात्री 9 वाजता स्ट्रीम केला जाणार आहे. तर टीव्हीवर ‘बिग बॉस 20’ पाहू इच्छिणारे प्रेक्षक कलर्स टीव्हीवर दररोज रात्री 10.30 वाजता हा शो पाहू शकतील. विशेष म्हणजे, हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील आवृत्त्याही एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेतही या रिअॅलिटी शोचा आनंद घेता येणार आहे.

‘बिग बॉस 20’च्या घरात यंदा तब्बल 18 स्पर्धक धमाल करताना दिसणार आहेत. यावेळी टीव्ही, चित्रपट, सोशल मीडिया आणि संगीत क्षेत्राशी संबंधित अनेक ओळखीचे चेहरे शोमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात एकत्र राहणार असून, विविध टास्कपासून घरातील वाद-विवाद आणि मनोरंजक किस्स्यांपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार आहे.

‘बिग बॉस 20’च्या कन्फर्म स्पर्धकांची यादी

  • माही विज
  • आम्रपाली दुबे
  • रिती तिवारी
  • अमन गांधी
  • उदिती सिंह
  • काजी तौकीर
  • मेरी कोम
  • अर्शिफा खान
  • कुशाल तंवर उर्फ गुल्लू
  • ईशा रिखी
  • आसिफ खान
  • रोहेड खान
  • फैसल खान
  • कनिका मान
  • रॅपर यंग डीएसए
  • खुशी दुबे
  • रिया अहीर
  • लव गिल

काय आहे यंदाची थीम?

‘बिग बॉस 20’ची थीम ‘वरदान’, ‘हाऊस ऑफ इल्यूजन’ आणि ‘ड्युअलिटी’ (तथास्तु) यावर आधारित आहे. या सिझनमध्ये निर्मात्यांनी एक मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यानुसार एलिमिनेट होणाऱ्या स्पर्धकांना ‘वरदान’ नावाची एक्स्ट्रा लाइफलाइन मिळणार आहे. या लाइफलाइनच्या माध्यमातून त्यांना गेममध्ये टिकून राहण्याची आणखी एक संधी मिळू शकते.

‘बिग बॉस’चं घर खूपच अनोखं

यंदा ‘बिग बॉस’चं घरही नेहमीपेक्षा वेगळं आणि आकर्षक असणार आहे. रंगीबेरंगी आणि हटके पद्धतीने सजवण्यात आलेल्या या घराची रचना सेट डिझायनर वर्षा जैन यांनी केली आहे. हे घर केवळ नेहमीच्या घरासारखं न वाटता एका अॅडव्हेंचर वर्ल्डसारखे भासेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. घरामध्ये झाडं-पानं, पक्षी आणि विविध प्रकारचे जीवही पाहायला मिळणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली