AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi : हे माझं घर आहे, माझ्या घरात हे चालणार नाही; रितेश देशमुख यांनी जान्हवीला का सुनावलं?

बिग बॉस मराठीच्या घरात कसंही वागणं सदस्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. रितेश देशमुख यांनी या सदस्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी या सदस्यांना आरसा दाखवला. त्यात जान्हवी किल्लेकर सर्वात वरच्या स्थानी होती. त्यानंतर निक्की तांबोळी, नंतर अरबाज, त्यानंतर अभिजीत सावंत यांच्यावर रितेश देशमुख यांनी चांगलीच फायरिंग केली.

Bigg Boss Marathi : हे माझं घर आहे, माझ्या घरात हे चालणार नाही; रितेश देशमुख यांनी जान्हवीला का सुनावलं?
रितेश देशमुखने जान्हवीला का सुनावलं?
| Updated on: Aug 26, 2024 | 9:49 AM
Share

बिग बॉस मराठीतील भाऊच्या धक्क्यावर अनेकांना धक्के बसले. सर्वात मोठा धक्का जान्हवी किल्लेकरला बसला. त्यानंतर निक्की तांबोळीला धक्के बसले. नंतर अरबाज आणि अभिजीत सावंत यांचेही कान उपटण्यात आले. जान्हवीने पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. त्यामुळे रितेश देशमुख यांनी जान्हवीला फटकार लगावलीच. पण जान्हवीला बिग बॉसच्या घरातील तुरुंगात टाकण्याची शिक्षाही सुनावली. आतापर्यंत आपण सेफ गेम खेळतोय असं वाटणाऱ्या जान्हवीला हा मोठा धक्का होता. यावेळी हे माझं घर आहे, तुमचं घर नाही. माझ्या घरात मी काहीही खपवून घेणार नाही, असंही रितेश देशमुख यांनी जान्हवीला सुनावलं.

बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरने आर्याची चादर फेकली होती. या प्रसंगाचा रितेश देशमुख यांनी उल्लेख केला आणि जान्हवीच्या वर्तवणुकीवर तिला चांगलीच फटकार लगावली. निक्कीच्या असिस्टंट आहात. मग तुम्ही आर्याची चादर का फेकली? त्यावर नाचला अन् अॅटिट्यूड देऊन म्हटला मला पाय पुसायचे होते. तुमच्या घरी तुम्ही असे पाय पुसता का? घरची चादर जमिनीवर ठेवून पाय पुसता? तुम्ही हे जर तुमच्या घरात असाल, पण इथे माझ्या घरात करू नका जान्हवी, असं रितेश देशमुख यांनी सुनावलं.

माज, दादागिरी, उर्मटपणा बंद

तुम्ही एवढ्यावर नाही थांबला. आर्या बेडरूमध्ये आली. तुमचा तिच्याशी वाद सुरू झाला. तुम्ही तिला धक्का मारला. तिने सुरुवात केली नव्हती. ती काही बोलली नाही. ती चादर खेचत होती. तुम्ही तिला धक्का मारला. तुम्ही तिला काय बोलला हे तुम्हाला आठवतं का? तुला फाडून टाकीन. तुला फोडून टाकेल. आणि वर कॅमेऱ्यावर येऊन बिगबॉसला म्हणाला आर्याला ट्रिटमेंटची गरज आहे. तुम्ही स्वत:चं बघा. तुम्हाला किती अँगर इश्यू आहे. तुमचा माज, दादागिरी आणि उर्मटपणा हे सर्व आज बंद होणार आहे, अशा शब्दात रितेश यांनी तिला सुनावले.

भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही

तुम्ही सर्वांना म्हणताना, मी बाहेर काढीन. जान्हवी मी तुम्हाला बाहेर काढतो. उभं राहा. प्लीज स्टँड अप, प्लीज. दरवाजा उघडा. जान्हवी, आजनंतर या भाऊच्या धक्क्यावर, माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्ही रिपेटेड ऑफेन्डर आहात. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही या कलाकारांबरोबर बसणं डिसर्व्ह करत नाही. मी तुम्हाला जागा दाखवतो. असं बोलू नये. तु्म्ही आजपासून एक आठवडा जेलमध्ये राहणार. इथेच राह्यचं, इथेच खायचं. इथेच झोपायचं. आज उद्या भाऊचा धक्का होईल. त्यात तुम्हाला जागा नाही. जोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर येत नाही, तोपर्यंत तुम्ही जेलमध्येच राहायचं, अशी शिक्षाच त्यांनी जान्हवीला सुनावली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.