तेजस्वी प्रकाश लोकांना आवडत नसेल पण मला आवडते : निशांत भट

Nishant Bhat on Tejasswi Prakash : बिग बॉसच्या घरात सहभागी होणारा निशांत हा पहिला कोरिओग्राफर आहे. अंतिम फेरीत आल्यानंतर, पुरस्कारासाठी जाहीर केलेल्या 50 लाखांपैकी 10 लाख घेऊन त्याने शो सोडला.

तेजस्वी प्रकाश लोकांना आवडत नसेल पण मला आवडते : निशांत भट
निशांत भट, तेजस्वी प्रकाश
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:10 PM

मुंबई : बिग बॉस 15 सिझनला नवी विजेती मिळाली आहे. यंदाचा पर्व तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) आपल्या नावे केलं. परंतु या संपूर्ण सीझनमध्ये एन्टरटेनर नंबर वनचा किताब निशांत भट (Nishant Bhat) आपल्या नावे करण्यात यशस्वी झाला. टीव्ही ९ भारतवर्षशी साधलेल्या संवादात त्याने बिग बॉसच्या प्रवासाबरोबरच तेजस्वी प्रकाश हिची तोंडभरुन स्तुती केली. बिग बॉस 15 मध्ये ‘विजेता ‘ म्हणून तेजस्वी प्रकाशच्या नावाची घोषणा झाली तेव्हा निशांत हा तिच्यासाठी चिअर करणाऱ्या काही स्पर्धकांपैकी एक होता. ‘ती माझी चांगली मैत्रीण झाली आहे आणि तेजस्वीसोबत बिग बॉसच्या घरात चांगला वेळ घालवला आहे, लोकांना ती आवडो अगर नाही पण मला मात्र ती आवडते’, अशा शब्दात निशांतने तेजस्वीची स्तुती केली.

तेजस्वी जिवलग मैत्रिण

निशांत म्हणाला, ‘खरं सांगायचं तर तेजस्वी माझी खूप चांगली आणि जिवलग मैत्रीण आहे. ती जशीही आहे, तशी मला ती आवडते. लोकांना कदाचित ती आवडणार नाही पण मला ती आवडते. ती एक चांगली परफॉर्मरदेखील आहे. तिचे काम मी यापूर्वी पाहिले आहे. मी बिग बॉसच्या घरात तेजासोबत खूप बोलायचो, तिला जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ती एक चांगली अभिनेत्रीदेखील आहे. नागिनसाठी जशी गरज आहे तशीच ती ‘सुंदर चेहरा’ आहे. केवळ सुंदरच नाही तर ती प्रतिभावानही आहे. नागिनच्या परफॉर्मन्सच्या वेळी आपण तिला जेवढं पाहिलं होतं, तितकंच तिला पाहून असं वाटतंय की तेजस्वी एक अप्रतिम नागिन ठरेल.

निशांत भटने गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसच्या फिनालेचे नृत्यदिग्दर्शन केले

बिग बॉस ओटीटीपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर 5 महिन्यांनंतर निशांत भटसाठी संपला आहे. याविषयी बोलताना निशांत म्हणाला की, ‘हा प्रवास एवढा लांबेल, असं कधीच वाटलं नव्हतं. मला तो शो नेहमीच करायचा होता कारण मी या शोमध्ये बरीच वर्षे कॅमेऱ्याच्या मागे काम केले आहे. स्पर्धकांसाठी नृत्य कोरिओग्राफ केलं. पण जेव्हा देव देतो तेव्हा ‘छप्पर फाड के देतो’, हे खरंय… बिग बॉसनेही मला ‘छप्पर फाड के’ दिलं.

निशांत बिग बॉस प्रवासावर खूश

निशांत पुढे म्हणाला, ओटीटी रनर अप ते बिग बॉस १५ च्या फायनलिस्टपर्यंतचा माझा प्रवास अप्रतिम आणि मनाला आनंद देणारा होता. इतक्या मोठ्या सेलिब्रिटींसमोर मी टिकून राहू शकेन, असं वाटलंही नव्हतं. पण लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. मला मतं दिली. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानू इच्छितो. कुणी काहीही म्हणो, पण मी माझ्या प्रवासात खूप आनंदी आहे.

बिग बॉसच्या घरात सहभागी होणारा निशांत हा पहिला कोरिओग्राफर आहे. अंतिम फेरीत आल्यानंतर, पुरस्कारासाठी जाहीर केलेल्या 50 लाखांपैकी 10 लाख घेऊन त्याने शो सोडला.

संबंधित बातम्या

‘माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?’ दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर आणि बहिण अनिशा पादुकोण म्हणाली…

Gehraiyaan Title Track : दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गेहराईयाँ’चं टायटल साँग रिलीज, दीड तासात दीड मिलियन पार

Celebrity Covid 19 Update : शबाना आजमी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण; लवकर ब-या होण्यासाठी करणार प्रार्थना

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.